मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील चामोर्शी तालुक्यातील नवरगाव (कुनघाडा) येथील आंबेडकरी समाजातील अनेक कुटुंबांनी गाव सोडले आहे. हे सर्व कुटुंब निळ्या ध्वजांसह महिलादेखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे नामफलक पोलीसाच्या मदतीने ग्रामपंचायतने अवैधरित्या हटविण्यात आल्यामुळे अनेक कुटुंबात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या आंबेडकरी समाजाने गाव सोडले आहे.
चामोर्शी तालुक्यातील नवरगाव (कुनघाडा) येथील बौध्द समाजाने गेल्या दोन वर्षापासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे नामफलक आंबेडकर वार्डातील चौकात नव्हे त्याच्या बाजुला गावठाण जमीनीवर दुर्गे यांच्या घरासमोर लावला होता. तसा प्रकारचा ठरावही ग्रामसभेचा झालेला असुन सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी पोलीस स्टेशन चामोर्शी एसडीपीओ गडचिरोली यांना वारंवार तक्रार करून सदर नामफलक पोलीसाच्या ताफ्यानी व ग्रामपंचायतच्या तत्कालीन बॉडीनी हटविला आहे.
आज दि. २१ डिसेंबरला सदर प्रकार घडल्यामुळे नवरगाव गावातील संपूर्ण बौध्द बांधवानी आपल्या मुलाबाळा सहीत गाव सोडून बैलबंडीने जात आहेत. कुठे जात आहेत हे अजुनही समजू शकते नाही. परंतु जातीयवाघ्याच्या जाचाला कंटाळून संविधान कर्त्याच्या नावाला विरोध करण्याऱ्या लोकांचा निषेध करून बौध्द समाजाने गाव सोडून जात आहेत. सदर घटना हि महाराष्ट्रातील पहिलीच घटना होय.

