मंगेश जगताप, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथे एका पोलीस पतंगच्या मांजा ने गळा कापून एका पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना समोर येताच मुंबई पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृतक आपले कर्तव्य बजावून घरी जात होते यावेळी रस्त्यात त्यांचा पतंगच्या मांजाने गळा चिरल्यामुळे या पोलीस हवालदाराला आपला जीव गमवावा लागला आहे. समीर सुरेश जाधव असे मृतक पोलीस हवालदाराचे नाव आहे. खेरवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
काय आहे प्रकरण… मृतक समीर सुरेश जाधव हे गोरेगाव येथील दिंडोशी पोलीस येथे कर्तव्यावर होते. ते आपली ड्युटी संपवून मोटारसायकल ने वरळी येथील त्यांच्या घरी जायला निघाले होते. यावेळी ते पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला पुलावरून जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. गळा चिरल्यानंतर त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तिकडे त्यांना मयत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. हा दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे. खेरवाडी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

