विध्यार्थीनी स्वावलंबी व्हावे.- बापूराव मडावी
संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मो न 9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राजुरा तालुक्यातील पाचगाव ग्राम पंचायत हद्दीत असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कैकाडीगुडा येथे साने गुरुजी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्मला मडावी, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कैकाडीगुडा यांची उपस्थिती होती. तर विशेष अतिथी म्हणून बादल बेले महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून बापूराव मडावी, ग्रा.पं. सदस्य पाचगाव, नेफडोचे अविनाश दोरखंडे, बबलू चव्हाण, रवी बुटले, मनोज कुरवटकर, ग्रा.पं. सदस्य पाचगाव, गोपाल जंबुलवार समन्वयक अंबुजा सिमेंट फॅक्टरी, विनायक बोंडे मुख्याध्यापक जी. प. प्राथमिक शाळा कैकाडीगुडा, संजीवनी कोटनाके ग्रा.पं. पेसा मोबिलायजर, रेखा तोडेट्टीवार, आशा सेविका आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. खरा तो एकची धर्म ही प्रार्थना घेण्यात आली. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे शाळेला भारताचे संविधान हे पुस्तक भेट देण्यात आले. विध्यार्थी ना भेटवस्तू व बिस्कीट पॉकेट वितरित केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक शिक्षक गजानन घिवे यांनी केले तर प्रास्ताविक विनायक बोंडे, मुख्याध्यापक यांनी केले.
यावेळी बोलताना बापूराव मडावी ग्राम पंचायत सदस्य पाचगाव म्हणाले साने गुरुजी यांच्या आईने त्यांच्यावर केलेल्या संस्कारामुळे ते स्वावलंबी बनले. लहानपणापासूनच मुलांवर योग्य संस्कार करणे आवश्यक असून विद्यार्थ्यांनी स्वावलंबी बनावे. स्वतः चे काम स्वतः करावी. कुठल्याही कामाची मनात भीती किंवा कमीपणा न ठेवता आपण आपले कौशल्य वापरून प्रगती करावी. ग्राम विकासासाठी उत्तम व दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता ग्राम पंचायत च्या माध्यमातून शाळेला आम्ही नेहमीच सहकार्य करू असेही यावेळी मडावी म्हणाले. गोपाल जंबुलवार यांनी दुचाकीने रस्त्याने प्रवास करतेवेळी आणि शेतीतील फवारणी करताना घ्यावयाची दक्षता आणि हेल्मेट चा वापर यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

