प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा,दि.27 : राष्ट्रीय किसान दिनानिमित्त विकास भवन येथे शेतकरी शास्त्रज्ञ चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कृषि क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी खा.रामदास तडस, आ.रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.जीवन कतोरे, एवोनिथ सिएसआरच्या प्रमुख विद्या पाल, डॉ.नागनाथ जांगवाड, शेतकरी शास्त्रज्ञ मंचचे अध्यक्ष दिलीप पोहणे उपस्थित होते. ही कार्यशाळा कृषि विभाग, कृषि विज्ञान केंद्र, एवोनिथ व बायफच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शेती क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्यात शेतकरी सुरेश घुमडे, समर हबीब शेख, प्रदीप सोनटक्के, उल्हास जैन, पुरुषोत्तम रेवतकर प्रतिभा गेडाम, भारती महेश पाटील, सचिन पोहाणे, स्नेहलता सावरकर, शोभाताई गायधने, गोपाल अग्रवाल यांचा समावेश आहे.

