पल्लवी मेश्राम नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- सध्या राज्यातून महिला आणि मुली मोठ्या प्रमाणात गायब होणाच्या घटना वाढत असल्याचे महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी सांगितले होते. त्यात एशीच एक घटना नागपुर येथून समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील एका गरीब विवाहित महिलेला तिची गुजरात या राज्यात विक्री केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका युवकाशी जबरीने लग्न लावून दिल्यानंतर तीन भावंडांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. संधी मिळताच तस्कराच्या तावडीतून ती पळाली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाने दोन महिलांसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पीडित 26 वर्षीय महिला ही पती व आपल्या दोन मुलींसह यशोधरानगर पोलिस स्टेशन हद्दीत राहते. पती मजुरी करतो घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे तिचा पती मुंबईला कामासाठी गेला. त्यामुळे पिढीत महिलेवर घरखर्च आणि दोन्ही मुलींची जबाबदारी आली. मिळेल ते काम करून दोन्ही मुलींचा सांभाळ करीत होती.
याच दरम्यान, आरोपी नंदा पौनीकर आणि मंगला वरकडे यांच्याशी तिची ओळख झाली. दोघींनी निशाला एका महिन्यांचा किराणा भरून देत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दोघींचेही वारंवार घरी येणे सुरू झाले. नंदा आणि मंगला यांनी महिलेला गुजरातमधील जामनगर शहरात एका श्रीमंत कुटुंबातील लहान बाळाला सांभाळायचे काम असल्याचे सांगितले. त्यासाठी 20 हजार रुपये वेतन देण्यात येणार असल्याची बतावणी केली.
निशाने पतीची परवानगी घेतली आणि काम करण्यास होकार दिला. नंदा आणि मंगला यांनी 25 जुलै रोजी निशाला दोन्ही मुलींसह नागपूर रेल्वे स्थानकावर नेले. त्यांच्यासोबत 17 वर्षांच्या दोन अन्य मुली होत्या. त्यांनाही काम मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. निशाला गुजरातमध्ये पोहचल्यावर संतोष वय 45 वर्ष नावाच्या युवकाच्या घरी नेले. तिच्याजवळून दोन्ही मुलींना हिसकावून घेत तिला धमकी दिली. गळ्यात हार घालून लग्न लावण्याचा बनाव केला.
अशी उघडकीस आली घटना: दरम्यान पिढीत महिलेचा काही संपर्क होत नसल्याने तिच्या पतीला संशय आला. त्याने आरोपी नंदा पौणिकर हिला पत्नी संदर्भात विचारपूस केली. मात्र, तिने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्यात वाद झाला. नंदाचा पती आणि पिढीत महिलेचा पती यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. हे प्रकरण यशोधरानगर पोलिस स्टेशन येथे गेल्यावर मानवी तस्करीचा प्रकरणाचा उलगढा झाला. या प्रकरणी 17 डिसेंबरला पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
तस्करांच्या तावडीतून सुटका: दरम्यान तिकडे पिढीत विवाहिता या तस्करांच्या तावडीतून सुटण्याच्या प्रयत्नात होती. संधी मिळताच ती तस्करांच्या तावडीतून पळाली. पिढीत महिलेने पोलिस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ यांच्याकडे दिली. त्यांनी महिलेला विश्वासात घेऊन प्रकरणाचा उलगढा केला. या प्रकरणात नंदा पौनीकर आणि मंगला वरकडे यांच्यासह बनावट पती संतोष, गोलू, प्रतिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन आणि सहायक आयुक्त श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक रेखा संकपाळ, उपनिरीक्षक मंगला हरडे, गजेंद्र ठाकूर, सुनील वाकडे, दीपक बिंदाने, श्याम अंगथुलेवार, शरीफ शेख, विलास विंचूरकर आणि अश्विनी खोपडेवार यांनी केली.

