उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- येथून एक अपघाताची घटना समोर आली आहे. बार्शीटाकळी – अकोला रस्त्यावर कारची झाडाला धडक दिल्याने दोन इसम या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी, दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास बार्शीटाकळी – अकोला रोडवर हॉटेल दीपकच्या समोर एक कार झाडाला धडकल्याने कार मधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. नागरीकांच्या मते रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ठरत आहेत अपघातांचे कारण. दुतर्फा असलेली झाडे तोडण्याची वाहन चालकाची व स्थानिक नागरीकाची मागणी जोर धरत आहे.

