महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन
हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हाच्या नावाने मानाचा तुरा रोहल्या गेला. महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यांचे संपूर्ण राज्यात कौतुक होत आहे. चंद्रपूर जिल्हात प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या नियोजनाने येथे भाग घेण्यासाठी आलेले खेळाडू आणि प्रशिक्षक अगदी भारावून गेले आहेत.
बल्लारपूर येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांत भाग घेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात आगमन होताच खेळाडूंचे भव्य स्वागतापासून तर जेवण आणि निवासाच्या व्यवस्था आणि ताडोबा जंगल सफारी यासर्व बाबीबदल पालकमंत्री मुनगंटीवार आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहे. विशेष म्हणजे येथे असलेला जेवणाचा दर्जा आणि व्यवस्था एकदम उत्तम असल्याच्या भावना खेळाडू आणि प्रशिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.

बल्लारपूर येथील विसापूर येथील तालुका क्रीडा संकूल येथे 27 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून जवळपास 1600 खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आदी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बाहेरून येणारे खेळाडू, प्रशिक्षक व सर्वांची निवास, भोजन, वाहतूक आदी व्यवस्था अतिशय दर्जेदार करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनला दिल्या होत्या. याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा व बैठका घेऊन अतिशय सुक्ष्म नियेाजन करून घेतले. त्याचीच फलश्रुती म्हणून येथे आलेल्या खेळाडूंनी व्यवस्थेबद्दल आनंद व्यक्त केला आहे.यावेळी हरयाणा येथून ॲथलेटिक्स शॉर्ट पुल स्पर्धेत सहभागी होणारी तमन्ना म्हणाली, येथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था अतिशय उत्तम करण्यात आली आहे. येथे येऊन खुप छान वाटत आहे. खेळाडूंसाठी प्रशासनाने सर्वच व्यवस्था दर्जेदार केल्या आहे. तर तमन्नाचे प्रशिक्षक म्हणाले, खेळाडूंना जेवण वेळेवर विशेष म्हणजे ग्राऊंडजवळ मिळत आहे, ही वाखाणण्याजोगी बाब आहे.

