हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपुर:- येथील उर्जानगर सि.टी.पी.एस. कंपनीमध्ये प्रकल्प बाधित गावातील सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट व नोंदणीकृत संस्थांना शासन निर्णयानुसार 80% स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख नितिनभाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनात तसेच शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोषभाऊ पारखी यांच्या नेतृत्वात उप तालुका प्रमुख बंडू पहानपाटे यांनी सी.टी.पी.एस. उर्जानगरचे मुख्य अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
सि.टी.पी.एस. उर्जानगरचे मुख्य अभियंता कुमरवार यांना प्रत्यक्ष भेटून दि.15/07/23 व दि.18/12/23 ला कंपनीमध्ये प्रकल्पबाधित गावातील सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट व नोंदणीकृत संस्थांना शासन निर्णयानुसार 80% स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे पत्र देवुन देखील आजपर्यंत दुर्लक्ष करुन स्थानिकांवर अन्याय करीत आहे.
त्यामुळे शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख नितिनभाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनात तसेच शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोषभाऊ पारखी यांच्या नेतृत्वात शासन निर्णयानुसार 80 टक्के स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासंदर्भात मुख्य अभियंता यांना निवेदनाद्वारे 52 गावांमध्ये सिटीपीएस कंपनी विरोधात तीव्र संताप दिसून येत असून त्याचा उद्रेक कधीही होऊ शकतो.
त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन 80 टक्के स्थानिक प्रकल्प बाधित गावातील बेरोजगारांना रोजगारांची संधी देण्यात यावी, अन्यथा आम्ही या सर्वांना सोबत घेऊन शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला.