महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोल्हापूर:- जिल्हातील हातकणंगले तालुक्यात डॉ. सायरस पूनावला इंटरनॅशनल स्कूल येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका 7 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर रॅगिंगच्या प्रकार समोर आला आहे. त्यात शाळेने पण कुठलीही कारवाई केली नसल्याने हे प्रकरण पोलिसात गेल्याने डॉ. सायरस पूनावला इंटरनॅशनल स्कूल आणि विजयादेवी यादव इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
पिढीत मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सायरस पूनावला इटरनॅशनल स्कूल येथे शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या शाळेतील 11 व 12 मध्ये शिक्षण घेत असलेल्या 30 ते 35 मुलांनी मिळून तिची छेड काढत तिचा विनयभंग केला. हे मुल इतक्यावरच थांबले नाही. ही पिढीत मुलगी लेडीज बाथरूम ला जात असताना तिला पाडण्यात आले. लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील असे हावभाव करून मोठं मोठ्याने खिडळणे, तिच्या स्कूल बसचा पाठलाग करून पिढीत मुलीच्या अंगावर तीन वेळा गाडी घालण्यात आली. आरोपी व त्याचे मित्र त्या पिढीत मुलीच्या घरासमोर येवुन घोळका करून दंगा करून तिची अश्लील हातवारे करून मोठमोठ्याने हसत होते. त्यानंतर यापैकी एका मुलाने शाळेत तिच्या छातीला आपला खाद्याने धक्का मारत तिचा विनयभंग केला. त्यात एका मुलाने तर संतापाची परिसीमा गाठत मुलींना पाळी कशी येते, किती रक्तस्वाव होतो, रक्त कोठुन येते, किती दिवस येथे, मुल कोठून होतात हे तुला माहीत आहे का? रेप बलात्कार कसे करतात हे तुला माहित आहे का? माझ्या 4 प्रेयसीन बरोबर मी काय काय करतो तुला सांगू काय? असे विचारत त्या पिढीत मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे संभाषण केले.
मागील 2 ते 3 महिन्यांपासून दररोज शाळेत असा प्रसंगाला सामोरं जावे लागत असल्याने आणि त्या मुलांनी दिलेल्या धमक्यानी घाबरून ही अल्पवयीन मुलगी संपूर्ण हादरली होती. हा सगळा प्रकार त्या मुलीने वर्ग शिक्षक गौसिया सय्यद प्रध्यापक डॉ. सरदार जाधव आणि स्पोर्टस कोच सागर पाटील डॉ. माधवी सावंत, सविता मॅडम आणि त्या विद्यार्थ्याच्या वर्ग शिक्षकांना बऱ्याचदा सांगितला तरी हा प्रकार सुरू होता. त्यात शाळेतील शिक्षकांनी आपल्या हात वर करत ही आमची जबाबदारी नाही आम्ही काहीही करू शकत नाही असे सांगून अशा आरोपींना मुख सहमती दर्शवली असल्याचे दिसून येत आहे.
मुलीने केला गळफास घेण्याच्या..
रोज शाळेत सुरू असलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या त्रासाला कंटाळून आणि डॉ. सायरस पूनावला इटरनॅशनल स्कूल या संस्थेच्या शिक्षकांनी आरोपी विद्यार्थांना मुख सहमती दिल्याच्या वर्तनाने ही अल्पवयीन मुलगी निराशेच्या खाईत गेली. तिला आपल शिक्षण आणि आयुष्य अंधारमय होत असल्याच्या जाणीवेने तिने एका रात्री गळफास घेण्याचा प्रयत्न केला पण आईचा हे लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर पिढीत मुलीच्या आईने काय झालं हे प्रेमाने विचारलं तर या पिढीत मुलीने सर्व घटना आपल्या आईला सांगितली.
पिढीत मुलीने महाराष्ट्र संदेश न्युजशी बोलताना सांगितले की, शाळेत रोज विद्यार्थी यांच्या कडून होणारे त्रासामुळे मला रोज रात्री झोप येत नसे. मला हे सर्व असाह्य झाल्यामुळे माझ्या मनामध्ये मरण्याचा विचार येवु लागलेने मी माझ्या मम्मीला एक दिवस विचारले की, ‘मम्मा फाशी कशी लावुन घेतात? त्यावेळी मम्मीने तुला काय करायचे आहे असे म्हणाली तेव्हा मी माझ्या मम्मीला सर्व सांगितल. मम्मीनी याबाबत शाळेला सांगितले असता शाळा प्रशासनाने ही घटना गांभीर्याने घेतली नाही. तसेच त्याच पिढीत मुलीला आणि आईला तुम्ही इतक्या छोट्या गोष्टीचा इशू करत आहात असे संतापजनक उत्तर दिले व आम्ही काही करू शकत नाही असे सांगितले त्यामुळे मम्मीनी मला घेऊन वडगाव पोलीस स्टेशन गाठून सर्व आरोपी मुला विरुद्ध तक्रार दाखल केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348