प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- प्रतिबंधित तंबाखावर बंदी घातली असली तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने सुगंधित तंबाखुचे अवैध व्यवसाय सुरू आहे. यात 12 डिसेंबरला प्रतिबंधित तंबाखुवर कारवाई करीत तिघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा शोध घेत असताना यवतमाळ जिल्ह्यातून एक टण वजनाचा तंबाखू जप्त
करण्यात आला आहे. ही कारवाई वर्धा शहर पोलिसांच्या पथकाने यवतमाळ येथील नेर तालुक्याच्या आजंती गावात केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
शहर पोलिसांनी बोरगाव मेघे आणि गिट्टीखदान परिसरात प्रतिबंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांवर 12 डिसेंबरला कारवाई केली होती. याप्रकरणी संजय माकोडे, अजय वासनिक, सरमद हुसेन या तीन आरोपींना अटक करण्यात आली होती.
पोलिस कोठडीदरम्यान सरमद हुसेन याने हा तंबाखु साठा यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथून आणला असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.
त्या आधारे कारावाई करीत मोहम्मद तनवीर मोहम्मद सिद्धीकी घाची आणि प्रतीक राठोड या दोघांना अटक करून (एमएच 29 टी. 5820) मालवाहू वाहन, असा एकूण 8 लाख 79 हजारांचा प्रतिबंधित तंबाखूसाठा जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांच्या निर्देशात
पोलिस उपनिरीक्षक सिन्नूकुमार बानोत, सचिन पवार यांनी केली.