Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नांदेड जिल्ह्यात जंगलात नरबळी? मृतुदेहाजवळ मिळून आल अघोरी पूजेचं साहित्य.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 10, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नांदेड जिल्ह्यात जंगलात नरबळी? मृतुदेहाजवळ मिळून आल अघोरी पूजेचं साहित्य.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️नांदेड जिल्हा प्रतिनिधी

नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील वाशीच्या जंगलातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. हिमायतनगर शहरात राहणाऱ्या एका तरुणाचा मृतदेह मिळून आला. या मृतदेहाशेजारी अघोरी पूजेचे साहित्य मिळून आल्याने ही मयत युवकाची नरबळी तर नाही देण्यात आला शंका उपस्थित केलीय. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्या कडून हत्येचा तपास करण्यात येतोय.

जंगलात मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला, त्या ठिकाणी अघोरी पुजेचं साहित्य मिळाल्याने अनेक शंकेला वाव फुटले आहे. या शिवाय मृतक युवकाचा चेहराही छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला आहे. दगडाने ठेचून निर्घृणपणे या युवकाचा खून करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघा पुरुषांवर गुन्हा दाखल केला आहे. कलम 302, 34 अन्वये एकूण चार जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जातोय.

काय आहे प्रकरण..
8 सप्टेंबर रोजी पांडुरंग तोटेवाड या तरुणाची हत्या करण्यात आली होती. तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या वाशीच्या जंगलात या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृत युवक हा आपल्या घराशेजारी बसलेला होता. त्यावेळी त्याला काहीतरी आमीष दाखवून बोलवण्यात आलं. वाशीच्या जंगल परिसरात घेऊन जाऊन इतर साथीदारांच्या मदतीने त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. दरम्यान, हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून त्याचा अपघात झाल्याचं भासवण्याचा प्रयत्नही करण्यात आला, असा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केलाय.

बालाजी तोटेवाड यांनी युवकाचा संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तरुणाची जुन्या वादातून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आलाय. परमेश्वर लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मण अक्कलवाड, रमेश लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मीबाई लक्ष्मण अक्कलवाड यांनी संगनमताने हे हत्याकांड केलं, अशी तक्रार हिमायतनगर पोलीस ठाण्यात देण्यात आलीय.

धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाशेजारी लिंब, तांब्या आणि फुलं आढळून आली आहेत. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांनीही या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरु केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी हत्या झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर, जमादार हेमंत चोले, अशोक सिंगणवाड यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या हत्याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Previous Post

हिंगणघाट: गिमा टेक्टाईल कंपनीतील कामगाराचा अपघाती मृत्यू, सर्विकडे हळहळ.

Next Post

पान टपरीवाल्याला गोधडी दाखवणार”, चंद्रकांत खैरेंच्या गुलाबराव पाटलांवरील टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, म्हणाले.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पान टपरीवाल्याला गोधडी दाखवणार”, चंद्रकांत खैरेंच्या गुलाबराव पाटलांवरील टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, म्हणाले.

पान टपरीवाल्याला गोधडी दाखवणार”, चंद्रकांत खैरेंच्या गुलाबराव पाटलांवरील टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, म्हणाले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In