प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
मोबा. न.8329084432
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागभीड दि. १ जाने:- ला ड्रायव्हर संघटना तसेच नागभीड तालुका काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने घेतलेले नवीन विधेयक नुसार अपघातातील वाहन चालक वाहन सोडून पळून गेल्यास वाहन चालकास १० लाख रु. दंड व १० वर्षाची शिक्षा नवीन कायद्यात केलेली आहे. कधी कधी वाहन चालकाची चुकी नसतानाही वाहन पेटवणे, ड्रायव्हरला मारहाण करणे, अशा अनेक घटना घडत असतात. तरी साधारण कुटुंबातील ड्रायव्हरला १० लाख रू. दंड तसेच दहा वर्षाची शिक्षा परवडणारे नाही. तरी या कायद्यात दुरुस्ती करून याबाबत दिनांक 5 जानेवारी 2024 पर्यंत ठोस निर्णय घ्यावे. अन्यथा व 6 जानेवारी पासून ड्रायव्हर संघटना आंदोलन करण्याचे ठरविण्यात येईल. याला सर्वशी जबाबदार प्रशासनाची राहील. अशा प्रकारचे निवेदन नागभीड तालुका काँग्रेस व नागभीड तालुका ड्रायव्हर संघटनेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी नागभीड तालुका कांग्रेस अध्यक्ष प्रमोद चौधरी, चिमूर विधानसभा काँग्रेस संयोजक विनोद बोरकर, नागभीड शहर कांग्रेस अध्यक्ष किशोर समर्थ, युवक कांग्रेस शहर अध्यक्ष महेश कुरझेकर, शत्रुघ्न देवाडे, संदीप करुटकर, संदीप देवाडे, विजय भोयर, संजय अलोणे, कपिल चौधरी, सलमान शेख, प्रदीप वाघमारे, रवी देवाडे तसेच नागभीड तालुका ड्रायव्हर संघटना उपस्थित होती.

