Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचे आले मोठे पीक, जिल्हात 290 बोगस डॉक्टर मात्र कारवाई फक्त पाच डॉक्टरांवर.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 11, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचे आले मोठे पीक, जिल्हात 290 बोगस डॉक्टर मात्र कारवाई फक्त पाच डॉक्टरांवर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️धुळे जिल्हा प्रतिनिधी

धुळे:- जिल्हातील गोरगरीब रुग्णांच्या भाबडेपणाचा फायदा घेत, वैद्यकीय परवाना नसताना अवैधरित्या दवाखाना रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या अवैध डॉक्टराचे धुळे जिल्ह्यात मोठे पीक आले आहे. जिल्हातील अनेक गावांमध्ये बोगस डॉक्टरांनी आपले बस्तान मांडले आहे. काही बोगस डॉक्टर तर आपली बॅग घेऊन खेडोपाडी फिरुन गरीब रुग्णांवर चुकीचे औषधोपचार करीत आहेत. या डॉक्टरांजवळ महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलचे कोणतेही प्रमाणपत्र नाही. परंतु आपण असाध्य रोगही दुरुस्त करीत असल्याचा खोटा प्रचार ही बोगस डॉक्टर मंडळी करीत आहे.

धुळे जिल्ह्यात तब्बल 290 बोगस डॉक्टरांची यादी प्रशासनाकडे असून देखील गेल्या आठ महिन्यात फक्त पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.

सर्वसामान्य आणि अत्यंत गरीब कुटुंबातील रुग्णांना मोठ्या रुग्णालयात उपचार घेणे परवडत नसल्याने हे रुग्ण जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. मात्र जिल्ह्यात अनेक जण वैद्यकीय शिक्षण न घेता प्रमाणपत्र नसताना देखील वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेकांच्या जीवाशी हे बोगस डॉक्टर खेळत असल्याचे समोर आले आहे. हे बोगस डॉक्टर अपूर्ण माहितीच्या आधारावर रुग्णांना औषधे देत असल्याने यामुळे अनेकांना गंभीर आजारांचा देखील सामना करावा लागला आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरीय पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आले आहे. या समितीकडे जिल्ह्यातील 290 बोगस डॉक्टरांची यादी असून आत्तापर्यंत फक्त पाच जणांवर कारवाई झाली आहे विशेष म्हणजे या समितीच्या कुठल्याही बैठका वेळेवर होत नाहीत.

जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांची संख्या पुढीलप्रमाणे

धुळे जिल्ह्यात नऊ तालुक्यात 290 बोगस डॉक्टरांची संख्या असून यातील सर्वाधिक संख्या ही धुळे तालुक्यात आहे. धुळे तालुक्यात 93 तर साक्री तालुक्यात 86 शिरपूर तालुक्यात 70 आणि शिंदखेडा तालुक्यात 41 असे बोगस डॉक्टर असून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षकांकडे पाठवली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

धुळे जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी त्यांची यादी जाहीर करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र अद्यापही ही यादी प्रसिद्ध झाली नसून बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे नागरिकाच्या मनात प्रशासन विषय आक्रोश ऐकू येत आहे.

Previous Post

..तर आम्ही साथ द्यायला तयार आहोत’; काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोलेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना खुली ऑफर.

Next Post

परराज्यात शिक्षण घेणाऱ्या राज्यातील इतर मागासवर्ग विद्यार्थ्यासाठी असलेली मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिंदे-फडणवीस सरकारने केली बंद.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
परराज्यात शिक्षण घेणाऱ्या राज्यातील इतर मागासवर्ग विद्यार्थ्यासाठी असलेली मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिंदे-फडणवीस सरकारने केली बंद.

परराज्यात शिक्षण घेणाऱ्या राज्यातील इतर मागासवर्ग विद्यार्थ्यासाठी असलेली मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिंदे-फडणवीस सरकारने केली बंद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In