पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पथक २ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि ०८/०१/२०२४ रोजी सुनील थोपटे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-२चे स्टाफसह कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार पो.कॉ.योगेश मांढरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक परदेशी इसम हा *कोंढवा येथील शोभा करनेशन सोसायटी तालाब समोरील सार्वजनिक रोडवर पुणे येथे मेफेड्रोन व मेथक्यूलॉन हा अमली पदार्थ विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळाली असता आम्ही स्वतः व अमली पदार्थ विरोधी पथकातील स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता इसम नामे १)KOMBO CARMELO MAYELE वय २७ वर्ष रा फ्लॅट नंबर २०२ गणराज सोसायटी जाधव नगर हांडेवाडी पुणे मूळ नागरिक देश -*अंगोला आफ्रिका हा त्याच्या ताब्यात एकूण ४,६०,०००/- रुपयाचा ऐवज त्यामध्ये
१) २,५८,०००/- किमतीचा १२ ग्रॅम ८३५मिलिग्रॅम मेथक्यूलॉन हा अमली पदार्थ,
२)१,४२,०००/-रु किमतीचा ७ ग्राम ७५ मिलिग्राम मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ
३) होंडा कं ची ऍक्टिवा मोपेड दुचाकी किमतीची रु ५०,०००/-
४)एक SHAOMI कंपनीचा मोबाईल, १०,०००/- किंमतीचा त्यात एक वोडाफोन कंपनीचे सिम कार्ड असा ऐवज हा विक्री करिता जवळ बाळगला असताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २२/२०२४ एनडीपीएस कलम 8 ( क ), 22 (ब ) (क)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे सह पोलिस आयुक्त ,श्री. अमोल झेंडे सो पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्री.सतीश गोवेकर सो सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे १ यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि सुनील थोपटे , पोलिस उप निरीक्षक दिगंबर चव्हाण,योगेश मांढरे,ASI शिवाजी घुले,पो हवा चेतन गायकवाड,संदीप जाधव,रवींद्र रोकडे,प्रशांत बोमदंडी,मयुर सूर्यवंशी,साहिल सय्यद,अजीम शेख, संदीप शेळके,नितीन जगदाळे,युवराज कांबळे,दिनेश बस्तेवाड व महिला पो हवा दिशा खेवलकर यांनी केली आहे.