हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो.9764268694.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- भारतीय बौद्ध महासभा तालुका राजुरा ची शाखा गठीत झाल्याबद्दल दिनांक 09 जानेवारी ला दोन वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल वैशाली बौध्द विहार सोमनाथपुर राजुरा येथे तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प व दीप प्रजलन करून त्रीशरण, पंचशील घेण्यात आले. त्यानंतर संतोष कांबळे यांनी जागतिक बौध्द धम्म ध्वजचे महत्व समजवून सांगितले तसेच भिमराव खोब्रागडे उपाध्यक्ष यांनी बौध्द धम्म ध्वज व बौध्द धम्म प्रचार प्रसार करताना क्रांती, प्रतीक्रांती कशी होत गेली याबद्दल सविस्तर सांगितले आणि धर्मुजी नगराळे, गौतम चौरे, गौतम देवगडे, प्रभाकर लोखंडे, चंद्रमणी वाघमारे, मुरलीधर ताकसांडे, उत्तम रामटेके यांचे अभिनंदन करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्या मध्ये दोन वर्षांत सतत 24 शिबिरा पैकी काही शिबिर घेवून धम्माचा प्रसार व प्रचार केला. धर्मुजी नगराळे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा राजुरा यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकारणी मध्ये रमाई जयंती, धम्म प्रबोधन तशेच 24 शिबिरपैकी धम्म उपासिका शिबिर बामणवाडा, राजुरा, गोवरी, धम्म प्रवचन मालिका व केंद्रीय शिक्षिका सत्कार, वर्षवास मालिका बामणवाडा, राजुरा, रामपूर, धोपटाळा कॉलनी, गोवरी, गोयेगाव, वर्षवास समारोप, भीमा कोरेगाव शोर्य दीन अभिवादन, समता सैनिक दल, संविधान दिन, शहर शाखा, ग्राम शाखा स्थापन केल्या यामध्ये राजुरा कार्यकारणी तशेच चंद्रपूर पश्चिम जिल्यातील सर्व केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, समता सैनिक दल चे कमांडर, मेजर आणि सर्व पदाधिकारी यांनी राजुरा तालुक्यामध्ये येऊन भारतीय बौध्द महासभा मधून बौध्द धम्माच्या प्रसार प्रचार करण्यात मोलाच्या वाटा आहे त्यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले.
हा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा तालुका राजुरा यांचा वतीने घेण्यात आला. या मध्ये सर्व उपासक उपासीका चे मोलाचे योगदान आहे. या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन गौतम चौरे सर नी केले व आभार प्रदर्शन अश्विनी मावलीकर यांनी केले आहे शेवटी सरण्यत्य घेऊन कार्यक्रमाच्या समारोप करण्यात आला.