तिरुपती नल्लला, राजुरा तालुका प्रतिनिधि
मो. 9822477446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मराठा सेवा संघ तथा जिजाऊ ब्रिगेड गडचांदूर प्रणित “दशरात्रोत्सव” अंतर्गत मराठा सेवा संघाचे सक्रिय कार्यकर्ते हरिचंद्र थिपे गुरुजी यांनी ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व 12 जानेवारी राजमाता माँ जिजाऊ जयंती या “दशरात्रोत्सव” प्रित्यर्थ व त्यांचे चिरंजीव अमेरिकेतील लुसियाना विद्यापीठात भौतिकशास्त्र या विषयात पीएचडी करीत असलेले भूषण थिपे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दि.10 जानेवारी रोजी गडचांदूर येथे समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठलराव थिपे, उद्घाटक माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रमुख अतिथी शिवश्री नामदेवराव ठेंगणे जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष शिवमती मीनाताई लांजेकर, गिरीधर पाणघाटे व भूषण थिपे सह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शिवश्री गिरीधर पानघाटे, नामदेवराव ठेंगणे व शिवमती ज्योतीताई थिपे यांनी आपल्या व्याख्यानातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या कर्तुत्वावर प्रबोधन केले. भूषण थिपे यांनी ते करीत असलेले संशोधन व अमेरिकेतील अनुभव तथा विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. भूषण थिपे यांच्या जन्मदिना प्रित्यर्थ केक कापून मान्यवरांनी त्याला उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते व थिपे परिवाराचे स्नेही उपस्थित होते.