युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी आपल्या रास्त मागण्या मान्य करण्यासाठी आदोलन सुरु केले आहे. सरकारने नागपुर येथे हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र प्रदेश आयटक महासचिव नेते शामजी काले, महाराष्ट्र अध्यक्ष राजु देसले, महाराष्ट्र कार्याध्यक्षा सौ. मंदाताई डोगरे, सौ. सुमनताई पुजारी व अन्य नेत्या सोबत चर्चा करण्यात आली चर्चा मधे मुख्यमंत्री एकनाथ शिदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यानी सर्व मागण्या मान्य करून आशा स्वयंसेविका ना 7000 रुपये मानधन व 2000 रूपये दिवाली भगिनी प्रोत्साहन भत्ता मान्य करून गटप्रवर्तका ना 6200 रुपये मानधन वाढ मान्य केली.
हिवाळी अधिवेशन संपूर्ण बरेच दिवस लोटले परंतु जीआर निघाला नाही म्हणूण सरकारने घोषणा केलेल्या मागण्याचा जीआर त्वरित काढुन सर्व मागण्या मान्य कराव्या यासाठी दि. 12 जानेवारी 2024 पासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यानी सौ. मंदाताई डोगरे याच्या नेतृत्वात संप पुकारला असुन काटोल तालुका आरोग्यं अधिकारी याचे कार्यालय समोर आदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात शेकडो आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक सहभागी झाल्या.
यावेळी सौ. मंदाताई डोगरे , जिजाबाई सेवतकर, ज्योती रक्षित तालुका सचिव, जयश्री भजन, माला चोपडे, वंदना सोमकूवर, वर्षा मेश्राम, निरंजना देशभ्रतार, माधुरी गजभिये, निता कालमेघ सह शेकडो आदी सहभागी झाल्य