अक्षय म्हात्रे पेण तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण:- पेण येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील 3 वर्षाच्या मुलीसह महिलाचे अपहरण झाल्याच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पेण येथील तरेआळी येथील सदगुरु प्राईड सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका महिलेला व तिच्या 3 वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली असून फिर्यादी पती वैभव घोसाळकर यांनी पेण पोलीस स्टेशन येथे तक्रारी दाखल केली आहे. 3 वर्षाच्या मुलीसह (पत्नी) महिलेच्या अपहरणाच्या गुन्हाच नोंद करण्यात आली आहे.
3 वर्षाचा मुलीची व महिलेचे अपहरण झाल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आपली तपासाची चक्रे अतीवेगाने फिरली असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. पेण येथील महिला विधी वैभव घोसाळकर वय 36 वर्ष व तिची मुलगी सिया वैभव घोसाळकर वय 3 वर्षे अशा वर्णनाच्या लहान मुलीचे त्यांचे राहते घरातुन कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले म्हणुन पेण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर महिला व लहान मुलीची माहिती कोणाला मिळून आल्यास त्याची खबर पेण पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन करण्यात आले असुन याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक मिनल शिंदे करत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 7385445348