संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा.न9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- कोरपना तालुक्यातील मौजा नारंडा येथील नवयुवक नाट्यकला मंडळच्या वतीने आयोजित केलेल्या “तीन अंकी नाट्यपुष्प संगीत : थैमान” या सामाजिक तथा कौटुंबिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या नाटकाचे देवराव भोंगळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
नाट्यरसिकांनी थैमान या सामाजिक तथा लावणीप्रधान कलाकृतीने बहरलेल्या नाटकाचा सकारात्मक आशय समजून घ्यावा, मनोरंजनात्मक दृष्टीकोनातून नाटकाचा आनंद घेत वाईट विचारांना येथेच त्यागावे. नाट्यप्रयोगाच्या यशस्वीतेसाठी माझ्या सर्वांना शुभेच्छा! अशी भावना याठिकाणी उद्घाटनीय मनोगतातून देवराव भोंगळे यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार ॲड. संजय धोटे, सरपंचा सौ. अनुताई ताजणे, निलेश ताजणे, भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, पो. पा. नरेश परसुटकर, उपसरपंच बाळा पावडे, माजी सरपंच वसंत ताजने, दिलीप गिरसावळे, विनोद नरेन्दुलवार, माजी सरपंच सदाशिव पोटदुखे, वनोजाचे सरपंच दिलीप पाचभाई, तंमुस अध्यक्ष हिराजी वांढरे, ग्रा.पं. सदस्य अनिल शेंडे, मिलिंद ताकसांडे, वर्षा उपासे, रुपाली उरकुडे, शालू हेपट, मुख्याध्यापक गुंडावर सर, पत्रकार मनोज गोरे, मंडळाचे सचिव प्रवीण हेपट, सत्यवान चामाटे, नागोबा उरकुडे, प्रमोद शेंडे, गौरव वांढरे, वैभव गंगमवार यांचेसह नाट्यरसिकांची मोठी उपस्थिती होती.