✒️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
पाथर्डी:- तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न पाथर्डी तालुक्यातील हंडाळवाडी येथे गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान झाला. ही घटना शुक्रवारी दि. 9 दुपारी घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नगरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जुन्या किरकोळ वादाच्या कारणावरून खुन्नस काढून तू काय गावचा दादा झाला का, तुला आता संपवूनच टाकतो, असे म्हणून गणेश दशरथ हंडाळ याच्या पोटात चाकूने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
वार करणारा मुलगा हा हंडाळवाडीतील असून तो अल्पवयीन आहे. हंडाळवाडी येथे गणपती विसर्जनाची मिरवणूक आटोपून घराकडे जाणारा गणेश दशरथ हंडाळ याच्यावर पोटावर चाकूने वार केला. चाकूचा वार केल्यानंतर गणेश रक्तभंबाळ होऊन जमिनीवर पडला. उपस्थितांनी त्याला पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन नगरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गणेशचे वडील दशरथ हंडाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत डांगे करत आहेत.