अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.-९८२२७२४१३६
सावनेर:- येथील रहिवासी भाऊ गोतमारे अनोखे व्यक्तिमत्व, निशुल्क सेवा करणारे यांनी यावर्षी गणपती उत्सव सुरू होण्यापूर्वी संकल्प केला होता की १० दिवसात ५१ ठिकाणी स्वतःच्या साऊंड सिस्टिम सहित निशुल्क भजन करणार आणि त्यांनी ते ८ दिवसात पूर्ण केले.ज्यांच्या घरी गणपती विराजमान झाले त्या वेगवेगळ्या ठिकाणी (घरी) जाऊन ५ भजन गायली.
त्यांचा डॉ.अमित बाहेती व दीपक कटारे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.त्यांचा सावनेर शहरात व ग्रामीण भागामध्ये त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच ते ६ वी ते १० वी पर्यंतच्या मुलांना गणित, विज्ञान, इंग्रजी निशुल्क शिकवतात.मुलांना योगा, तायकांडो, पोहणे, नृत्य, गाणे म्हणजे भजन निशुल्क शिकवतात. सामाजिक कार्यात ते नेहमीच तत्पर असतात.त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांनी नॅशनल चॅम्पियनशिप तायकाँडो मध्ये गोल्ड मेडल मिळवलेले आहे.
सावनेर मधून दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे.त्यांनी वयाच्या ४८ व्या वर्षी ब्लॅक बेल्ट प्राप्त करून स्वतःचे निशुल्क क्लासेस सुरू केले.एक अनोखा योगायोग घडला वडील आणि मुलगा दोघेही विद्यार्थी. १९९१ मध्ये वडील इंग्रजी विषयाचे बारावीत विद्यार्थी होते तर आता २०२१ मध्ये मुलगा ७ वि मध्ये तायकाँडो चा विद्यार्थी होता. यावर्षी त्यांनी वेगळाच रेकॉर्ड ब्रेक केला.ओम ठाकरे ला १ ली ते ७ वी पर्यंत शिकवणी राहून २ ते ३ मार्क कमी पडायचे, पण त्यांनी त्याला शिकवणी शिवाय इतका मोटिवेट केले की आता त्याला शाळेच्या परीक्षेत ८ वी मध्ये पूर्ण पैकी पूर्ण मार्क मिळाले.
गोतमारे ३० फूट खोल पाण्यावर पद्मासन व शवासन सुद्धा करतात. ते व्यसनमुक्ती अभियान पण चालवतात. ते सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर आहे.त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना १५० स्कूल बॅग निशुल्क वाटप केल्या .तसेच ते राष्ट्रीय काेयला खदान मजदूर संघ सावनेर सब एरिया युनिटचे उपाध्यक्ष आहे.अशी त्यांची ओळख आहे.जे विद्यार्थी ट्युशन्स लावू शकत नाही त्यांनी या क्लासचा जरूर फायदा घ्यावा. त्यांचा मो. नं. 8888665366 वर संपर्क करावा.या सर्व गोष्टीसाठी त्यांना त्यांच्या आईने प्रेरित केल्याची माहिती गोतमारे यांनी सांगितले.
संकल्प पूर्ण करण्याकरिता मुरलीधर खाटीक,शालिनी कुथे,पार्वताबाई अडकिने, मंगेश गोतमारे, भारतीबाई, राजेश भारद्वाज,मिलिंद सातपुते, गौरव गोतमारे,ओम ठाकरे व तायकांडो चे विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

