अनिल अडकिने नागपुर सावनेर प्रतिनिधी
मो. नं. ९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 17 जाने:- आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि पुण्यानी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने सावनेर येथे भव्य मोफत हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शिबिरात 20 ते 40 या वयोगटातील 350 तरुणांची निशुल्क हृदय तपासणी करण्यात आली.
भव्य मोफत हृदय तपासणी शिबिराचे उद्घाटन डॉ. अनुज सारडा यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुनील केदार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रवीण चव्हाण होते. डॉ. अमित बाहेती, डॉ. शिवम पुण्यानी यांच्या प्रमुख उपस्थितित पार पडला. या कार्यक्रमाचे संचालन वत्सल बांगरे यांनी केले तर डॉ. शिवम पुण्यानी यांनी आभार मानले.
या शिबिरात डॉ. चांडक डॉ. स्वाती पुण्यानी, डॉ. अंकिता बाहेती, डॉ. रेणुका चांडक, डॉ. रूपाली गायकवाड, डॉ. आशिष भट्टा, डॉ.प्रफुल कटक, डॉ. तृप्ती पाहुरकर, डॉ. निकिता कळंबे, डॉ. श्रीकांत बोंडे, साजिद अहमद यांनी सेवा दिल्या.

