अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शहरात भटक्या श्वानांनी उच्छाद मांडल्याची परिस्थिती आहे. शहरात भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येमुळे अकोलेकरांच्या नाकीनऊ आले आहेत. महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. मोकाट कुत्र्यांचा सर्वाधिक धोका लहान मुलांना, तसेच रात्री बेरात्री घरी किंवा कामावर जाणाऱ्या लोकांना आहे.
दुचाकी वाहनाच्या मागे हे मोकाट कुत्र्ये लागल्याने दुचाकी वाहन चालक वाहन जोरात पळवतात यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. अकोला शहरात गेल्या काही वर्षांपासून मोकाट श्वास पकडण्याची मोहीम गुंडाळण्यात आली आहे. त्यामुळे शहरात मोकाट श्वानांचा हैदोस सुरू आहे.
महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या मोकाट कुत्र्यांचा चावल्यामुळे बरेच मुले, मुली तसेच महीला पुरुष जखमी झाले आहेत. कुत्रा चावल्यास रेबीज होऊ शकतो. रेबीज व्हायरस रुग्णाच्या डोक्यात शिरून रुग्ण कोमात जाऊ शकतो किंवा मृत्यू होऊ शकतो, म्हणून तात्काळ या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी कविता द्विवेदी आयुक्त महानगरपालिका यांना ईमेल द्वारा केलेल्या तक्रारी द्वारा केली आहे.

