राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मुंबई येथील वरळी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एक प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये एका ग्राहकाच्या शाकाहारी जेवणात मृत उंदीर सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. वरळीतील एका आलिशान आणि प्रसिद्ध हॉटेल बार्बेक्यू नेशन येथे जेवणाची ऑर्डर केली होती. पण या जेवणात चक्क मेलेला उंदीर आढळून आला आहे.
वरळीतील प्रसिध्द हॉटेल बार्बेक्यू नेशन मधून जेवण ऑर्डर केल्यानंतर, हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. राजीव शुक्ला असे त्या इसमाचे नाव असून त्याला या सगळ्याची झळ बसली. त्याने आता बार्बेक्यू नेशन या हॉटेल विरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र संदेश न्युज
प्रयागराज येथील राजीव शुक्ला हे कामानिमित्त मुंबईत आले होते. 8 जानेवारी रोजी त्यांनी वरळीतील बार्बेक्यू नेशनमधून व्हेज जेवण मागवले. मात्र त्यातील दाल मखनी खाल्ल्यावर त्यांना काहीतरी विचित्रच चव लागली. म्हणून त्यांनी त्या डब्याची नीट तपासणी केली असता त्यामध्ये मेलेला उंदीर आणि झुरळ आढळलं. एवढंच नव्हे तर ते जेवण जेवल्यावर त्यांची अचानक तब्येत बिघडली. पोटदुखी, मळमळ असा त्रास त्यांना जाणवू लागला. राजीव यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. पुढचे 75 तास (तीन दिवस) ते रुग्णालयातच होते.
राजीव शुक्ला यांनी बार्बेक्यू नेशनचे मालक, व्यवस्थापक आणि शेफ यांच्याविरुद्ध नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. परंतु अद्याप तक्रार झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

