श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हातील परळी तालुक्यातून एक मन हेलावणाऱ्या अपघाताची घटना समोर आली आहे. दुपारच्या सुमारास बोअरवेल खोदण्यासाठी आलेल्या गाडीचा वीज वाहक तारांशी संपर्क आला. यामुळे या गाडीममध्ये वीजवाहक तारांमधून करंट लागून या गाडीत असलेले दोन मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन मजूर जखमी झाले आहेत.
12.30 वाजताच्या सुमारास एका बोअरवेल खोदण्यासाठी आलेल्या गाडीला विद्युत पुरवठा करणाऱ्या ताराला स्पर्श झाला. त्यामुळे गाडीत बसून असलेल्या मजुराला जोरदार करंट लागून दोघांचा मृत्यू झाला. यावेळी मृत्यू झालेल्या मजुरांचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले. तर दोन जखमी मजुरावर उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार परळी तालुक्यातील वाघबेट येथे पाण्याचा बोरवेल खोदण्यासाठी ओरिसा राज्यातील मजुरांसह बोरवेल मशीन घेऊन सहा जणांचे एक पथक आले होते. यावेळी बोरवेल खोदण्याचे काम संपल्यानंतर बोरवेलची ही गाडी परळी शहराकडे येत होती. रस्त्यात वीजवाहक तारांना या गाडीचा संपर्क झाला. वीज वाहकतारांचा विद्युत प्रवाह संपूर्ण लोखंडी पाईप असलेल्या या गाडीत उतरला. या गाडीमध्ये एकूण सहा मजूर बसलेले होते. त्यापैकी करंट लागून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोनजण जळून जखमी झाले आहेत.
बोरवेल वरील हे सर्व मजूर ओडिसा राज्यातील असून, गोविंदा धवन सिंग व संदीप डाक्टर असे मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. अन्य दोन मजूर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या वाहनाच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.