अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
मो. नं. ९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ३० जाने:- सावनेर येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील बाजार चौकातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून 10 लाख 36 हजाराची रक्कम चोरट्यांनी उडविण्याची घटना पहाटे 3.53 वाजताच्या सुमारास शासकीय दूध डेअरीच्या काही अंतरावर असलेल्या घटे यांच्या घराशेजारील एटीएम मध्ये घडली. ही घटना समोर येताच संपूर्ण शहरात एकच खळबळ माजली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या रेकॉडिंग नुसार आज दिनांक 30 रोजी पहाटे 3.53 वाजताच्या सुमारास 4 ते 5 चोरट्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले बाजूला असलेल्या एचडीएफसी मध्ये असलेला कॅमेरा तोडला व नंतर एसबीआयचे एटीएम गॅस कटरने तोडून त्यातील १० लाख 36 हजाराची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. यासंबंधी घर मालक प्रवीण घटे यांनी सावनेर पोलीस स्टेशन ला 5 मिनिटातच 4 वाजता फोन करून माहिती दिली असता पोलीस अर्धा तास उशिरा पोहोचली यावरून एखादी घटना टाळण्यासाठी सावनेर पोलीस किती सज्ज, तत्पर आहे हे जनतेला कळणार काय?
सावनेर येथून एटीएम फोडून चोर हे नागपूर दिशेने पळाले मात्र पाटणसावंगी टोल नाक्यावर टोल न भरता एका ट्रक मागून आपली कार काढून चोरट्यांनी धूम ठोकली.
एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. कॅमेरे केले काळे, सायरन वाजले आणि चोरटे पसार
सावनेर शहरातील बसस्थानक जवळील बसवर कॉम्प्लेक्स येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएमची रात्री 1.30 च्या सुमारास दोघे कार ने येऊन पाहणी करून गेले. व 30 तारखेच्या पहाटे 3.53 वाजताच्या सुमारास येऊन बँकेचे कॅमेरे काळे करून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.मात्र बँकेचे सायरन वाजल्याने चोरट्याने धूम ठोकली.

