राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका पोलीस अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे पोलीस विभागात खळबळ माजली आहे. या लाचखोर अधिकाऱ्याला पोलिस स्टेशन मध्येच सापळा लावून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दोन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले. शरद पवार असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. पवार भिवंडीतील नारपोली पोलिस स्टेशन येथे कार्यरत असल्याची माहिती एसीबीने दिली.
तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध नारपोली पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल असून दोषारोपही तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये मदत करण्यासह मुलाला पाच नंबरचा आरोपी दाखवण्यासाठी या गुन्ह्याचा तपास करणारे सहायक पोलिस निरीक्षक शरद पवार वय 37 वर्ष यांनी तक्रारदाराकडे 5 लाखांच्या लाचेची मागणी करत दोन 2 स्विकारण्याचे मान्य केले. या लाचेबाबत तक्रार आल्यानंतर एसीबीने पडताळणी केली.
लाचखोर शरद पवार यांनी तक्रारदार यांना पैसे घेऊन नारपोली पोलिस ठाण्यात बोलवले होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुणालाही कुणकुण न लागता पोलिस स्टेशन येथे सापळा लावत 2 लाखांची लाच घेताना पवार यांना रंगेहात पकडले. याबाबत पुढील कारवाई चालू असल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई एसीबीच्या ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर, सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक माधवी राजेकुंभार यांच्या पथकाने केली.