✒️ पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे:- कुप्रसिध्द अट्टल घरफोडी चोर “चोर राजा उर्फ राजेश पपुल” यास केले जेरबंद त्याचेकडुन १४ घरफोडी चोरीचे गुन्हयांची उकल करीत ४२ तोळे सोने व ०४ किलो चांदीचे दागिने, दोन अग्निशस्त्रांसह जिवंत काडतुसे असा एकुण २४,६४,२००/- रु किचा मुद्देमाल केला हस्तगत गुन्हे शाखा युनिट-२ कडील पोलीस अंमलदार यांना बातमी मिळाली की, राजेश पपुल उर्फ चोर राजा हा कात्रज येथील रहाते घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली.
त्याअनुशंगाने युनिट-२ चे प्रभारी क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंगलदार यांच्या मदतीने दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सच्चाई माता मंदीर, दुग्गड चाल, कात्रज, पुणे येथे तीन पथके तयार करुन त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफीने पकडून त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव राजेश ऊर्फ चोर राजा राम पपुल, वय-३८ वर्षे, रा. सच्चाईमाता मंदीर, दुग्गड चाळ, कात्रज, पुणे असे सांगितले.
नमूद आरोपीस डेक्कन पो. स्टे. गुरनं. ०५/२०२२. भा.द.वि. कलम ४५७, ३८०, ४२७, आर्म अॅक्ट कलम ३(२५),म.पो.का. कलम ३७(१) (३) १३५ या गुन्हयात अटक करून त्याचे ताब्यातुन पुणे शहर परीसरा मधील डेक्कन (१) बंडगार्डन (१) भारती विद्यापीठ (१) दत्तवाडी (२) सिंहगड रोड (२) वारजे माळवाडी (१) हडपसर (२) कोंढवा (१) वानवडी (१) सहकारनगर (१) विश्रामबाग, जि.सांगली येथील (१) असे एकुण १४ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन, नमुद गुन्हयां मधील ४२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ४ किलो चांदीचे दागिने, एक पिस्टल, एक रिव्हॉल्वर व दोन जिवंत काडतुसे, गुन्हयात वापरलेली एक वेप्सा मोपेड गाडी, दोन लोखंडी कटावण्या, दागिने वजन करण्याच्या दोन मशीन्स असा एकुण २४.६४,२०० /- रु. किंचा मुददेमाल हस्तगत करण्यात जाले आहे. यातील इतर आरोपीचा शोध सुरु असुन सराफ कारागिर नामे अजय वेदपाठक याने सोन्या-चांदीचे दागिने स्विकारलेले होते. त्याचेविरुध्द पुढील योग्यती कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली आहे. तपासा मध्ये आणखी अग्निशस्त्रे व इतर घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडील पोलीस उप-निरीक्षक, राजेंद्र पाटोळे हे करीत आहेत. अटक आरोपी हा रेकॉर्डवरील अट्टल घरफोडीचोर असुन त्याचेवर पुणे तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालया मध्ये १०० पेक्षाजास्त गुन्हे नोंद असून, त्यापैकी अनेक गंभीर स्वरुपाचे आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त श्री संदिप कर्णिक, पोलीस अपर आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री श्रीनिवासघाडगे, सहा. पो. आयुक्त, गुन्हे, श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखा युनिट- २. पुणे शहर, सहा. पो. निरी. वैशाली भोसले, विशाल मोहिते, पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार, गजानन सोनुने, उज्वल मोकाशी, कादीर शेख, उत्तमतारु, संजय जाधव, समिर पटेल, साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे, निखिल जाधव, मोहसिन शेख, नामदेव रेणुसे, गणेश थोरात, प्रमोद कोकणे, शंकर नेवसे, नागनाथ राख विनोद चव्हाण, विजयकुमार पवार यांनी केली आहे.

