बालाजी शिंदे पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ऑनलाइन पुणे:- पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे 10 व्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे.
क्रिएटिव्ह अकॅडमीचे संचालक असलेल्या आरोपीने अल्पवयीन पीडित मुलीला म्हटले की, “मी तुझे करिअर बनवून देईल तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये रहा, मी तुझ्या घरच्यांना सांगेल तू इथे मुलांसोबत असते”असे म्हणत आरोपीने पीडित विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार केली. क्रिएटिव्ह अकॅडमीचे संचालक नौशाद शेख असे या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील रावेत कॉर्नर परिसरात आरोपी नौशाद अहमद शेख यांची क्रिएटिव्ह अॅकेडमी आहे. या अकॅडमीमध्ये 2021 साली पीडित विद्यार्थिनीने प्रवेश घेतले होता. यासाठी तिने 2 लाख 26 हजार रुपये ऍडमिशन फी भरली होती. प्रवेश घेतल्या नंतर मुलगी अकॅडमी मध्येच राहू लागली. याच हॉस्टेलच्या पहिल्या माळ्यावर आरोपी नौशाद अहमद शेख हा देखील राहत होता. त्याने विद्यार्थिनीवर दबाव आणत “मी तुझे करिअर बनवून देईल तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये रहा” असे तिला सांगितले. परंतु हे सर्व करण्यासाठी ही विद्यार्थिनी तयार झाली नाही. यामुळे आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच “तू हे सर्व घरी सांगितले तर, तुझ्या घरच्यांना फोन करून सांगेन तू इथे मुलांसोबत संबंध ठेवते” असे विद्यार्थिनीला धमकावले.
आरोपी नौशाद इतक्यावरच थांबला नाही तर त्याने 2022 ला पीडित विद्यार्थिनीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतले होते. याठिकाणी देखील त्याने विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी विद्यार्थिनीने प्रतिकार करत आपली तेथून सुटका केली. या सर्व घटने प्रकरणे पोलिसांनी अकॅडमीच्या एका माजी विद्यार्थिनीवर देखील गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आरोपी नौशाद शेखला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास पोलीस करत आहे.

