अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दि.29 जानेवारीला हिंगणघाट शहरातील गिमाटेक्स कंपनीत झालेल्या अपघातात एका कमगराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. प्रमोद फूलझेले या मृतक कामगाराचे नाव होते.
मृतक प्रमोद फूलझेले हे कंपनीत आपले कार्य करीत असताना अचानक डीपी मधे स्फोट होऊन ते गंभीररित्या जख्मी झाले होते. यावेळी कंपनीच्या वतीने त्यांना उपचारासाठी त्वरीत सेवाग्राम रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु त्याची प्रकृती नाजूक होत गेली व दि.4 फेब्रुवारीला सकाळी त्याची प्राणज्योत मावळली. त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कंपनीच्या आत मध्ये कामगाराचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने त्यानंतर मृत्यकच्या वारसानी गिमाटेक्स कंपनीच्या व्यवस्थापक यांना नुकसान भरपाईची मागणी केली होती. यामध्ये हिंगणघाट शहरातील सामाजिक कार्यकर्ते डाॅ. उमेश वावरे यांनी मध्यस्थी करत मार्ग काढत कंपनीचे मॅनेजर पठान यानी मृत्काच्या वारसाच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मृत्यकाच्या वारसाना स्थाई नौकरी, पत्नीला पेंन्शन, तसेच 9 लाख रूपयाचा धनादेश त्वरीत देण्यात आला.
यावेळी मृत्यक प्रमोद फूलझेले यांचे नातलग, डाॅ. उमेश वावरे, चारू आटे, मनिष कांबळे, पंकज चारबे, निखिल, कामगार युनियनचे पांडूरंग बालपाडे, जयंत बावणे, दिवाकर बरबटकर कंपनी तर्फे मॅनेजर श्री. पठान, श्री. पराग उपप्रबधक, जितेंद्र शर्मा महाप्रंधक इत्यादी हजर होते.