निखिल पिदुरकर विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- आम आदमी पक्षाचे नवनियुक्त प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजितदादा फाटके पाटील संगठन बांधणी आणि पूर्ण ताकदीणीशी निवडणूक तयारीसाठी विदर्भ दौऱ्याची चंद्रपूर येथील आढावा बैठक पार पडली.
आम आदमी पक्ष महाराष्ट्र चे नवनियुक्त प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री अजितदादा फाटके पाटील विदर्भाच्या संगठन विस्तार बूथ पर्यंत करण्यासाठी दौऱ्यावर आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण ताकदीणीशी आम आदमी पार्टी लढणार या तयारी साठी त्यांची चंद्रपूर येथे दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी आढावा बैठक घेतली आहे.
आम आदमी पार्टी ने देशभरात नवीन आशा आणि अपेक्षांची लाट निर्माण केली. महाराष्ट्रात अनेक पक्ष आणि अनेक नेते आहेत पण महाराष्ट्रातील जनतेसाठी कोणीही काम करत नसल्याचा दावा अजितदादा फाटके पाटील यांनी केला आहे.
दिल्ली पंजाब प्रमाणे महाराष्ट्र सुद्धा आम आदमी पार्टीचा विस्तार लोकशाही मूल्यांची जोपासना आणि जनसामान्यांचे शिक्षण, आरोग्य, बेरोजगार, शेतकरी, मजूर, कष्टकरी यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सामान्य नागरिक मोठ्या उत्साहात या राजनीतिक क्रांतीसाठी जुडत आहे. अनेक जागृक नागरिक ज्यांना या राजनीतिक क्रांतीच्या चळवळीमध्ये सामील व्हायचे आहे त्यांनी सामील व्हावे त्यांनी महाराष्ट्राला खऱ्या दृष्टीने व्यापक स्वरूपात लोकशाही प्रधान महाराष्ट्र बनवून आम आदमी पक्षाचे कार्य करावे. ” असे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष अजितदादा फाटके पाटील यांनी पत्रपरिषदेत आवाहन केले.
“भारत भर निवडून दिलेले लोकप्रतिनिधी दोन राज्यांमध्ये सरकार अनेक राज्यांमध्ये आमदार असलेल्या लोकशाही प्रधान लोकाभिमुख आम आदमी पार्टी मध्ये शहरातील तमाम नागरिकांना ज्यांना लोकशाही प्रमाणे कार्य करणाऱ्या राजनीतिक क्रांती घडवणाऱ्या आम आदमी पार्टी पक्षात सहभाग घ्यायचा असेल त्यांनी पक्षाच्या शहराच्या व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.”असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री भूषण ढाकूळकर यांनी केले यांनी केले.
महाराष्ट्रातील जनता देवावर अवलंबून आणि असहाय्य आहेत. लोकप्रतिनिधी मार्फत लोकांचे प्रश्न सुटत नसून त्यांना बदलवण्याची वेळ आली आहे. लोकांकडे आता आपच्या रूपाने एक पर्याय आहे. त्यामुळे लोकांची आता पहिली पसंती आम आदमी पार्टी बनत असून चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांनी पक्षाशी संपर्क करावा व मोठ्या संख्येने सामील व्हावं असे आवाहन जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी केले.
81 आम आदमी पक्षाच्या बैठकीला ज्येष्ठ नेते सुनिल मुसळे, जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गडलेवर, सुरज ठाकरे, सुरज शाह, जिल्हा संगठना मंत्री योगेश मुऱ्हेकर, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे,जिल्हा सचिव राजकुमार नगराळे, प्रशांत सिदुरकर,शहर अध्यक्ष योगेश गोखरे, महिला अध्यक्ष ऍड तबस्सूम शेख,शेतकरी जिल्हाध्यक्ष दिपक बरशेट्टीवार, डॉक्टर आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.सलिम तुकडी, सह संगठक सुनिल राठोड, आशिष कुचंनकर, वकील संगठन जिल्हाध्यक्ष ऍड. किशोर पुसलवार, अशोक माहूरकर, सर्फराज भाई, सोशल मीडिया पसहसंयोजक क्रिश कपूर, बल्लारपूर अध्यक्ष रवी पुप्पालवार, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभय्या,जिल्हा सह सचिव प्रा किशोर दहेकर, रहेमान पठाण आणि सुदेश भालेकर, महानगर महासचिव स्वप्नील घागरगुंडे, महानगर सहसचिव सुधीर पाटील, महानगर महिला उपाध्यक्ष साफिया शेख आणि सुजाता देठे, गणेश बनसोड, शिक्षक आघाडी महानगर अध्यक्ष ऐकनाथ हांडेकर, महानगर व्यापारी आघाडी उपाध्यक्ष राजू चौरशिया, महानगर सहासंघटन मंत्री नागसेन लभाने, मीडिया प्रमुख प्रशांत रामटेके जिल्हा उपाध्यक्ष नावेद खान, मधुकर साखरकर शिक्षक जिल्हाध्यक्ष उदय मोहीतकर, सुमित हस्तक, अनुप तेलतुंबडे, मनीष राऊत, रंजीत बोरकुटे, भीमराज बागेसर, जिल्हा वाहतूक संगठना उपाध्यक्ष संगम सगोरे, वाहतूक संगठन तालुका अध्यक्ष दिलशान काझी, सुरेंद्र जीवने, अनुज चव्हाण, विशाल माने, सागर बोबडे, अफझल आली, शमशेर सिंह चौहान सह जिल्ह्यातील पक्षाचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.