✒प्रविण जगताप ✒️
महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
वर्धा/कारंजा घाडगे :- पुराच्या पाण्यात दोघे जण वाहून
जात असताना कारंजा पोलिस देवदूत म्हणून धावून आले. पोलिस प्रशासना मुळे दोघांचा जीव वाचला असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.कारंजा तालुक्यात सर्वत्र धो-धो मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तालुक्यातील सर्व नदी नाले मुसळधार पावसाने तुडुंब भरून वाहू लागले होते.
सर्वच ठिकाणी जवळपास पूर सद्रुष्य स्थिती निर्माण झाली होती. कारंजा पोलिस स्टेशनचे हद्दीतून कारंजा शहरात आठवडी बाजार निमित्ताने तालुक्यातून
खेड्यापाड्यातून नागरिक हे बाजाराकरिता शहरात आले होते. तालुक्यातील बोंदरठाणा येथील खरकाडी नदीला आलेल्या पुरात मेघराज बापूराव खवशी वय 72 वर्ष रा. बोंदरठाणा व त्यांचा भाचा राहुल जनार्दन देवासे हे वाहत जात होते. पण, अचानक झाडाला अडल्याने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. हे दोघेही कांरजा येथील बाजार आटोपून दुचाकीने गावाकडे जात होते. पण, पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी या पुरातून दुचाकी घातली आणि त्यात ते दोघेही दुचाकीसह वाहून गेले.
पुलापासून जवळपास 200 मीटर अंतरावर असलेल्या झाडाला अडल्यामुळे ते दोघही झाडावर बसले. सदर माहिती गावचे पोलिस पाटील यांनी पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांना दिल्यानंतर त्यांनी उपस्थित पोलिस कर्मचारी यांचेसोबत घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर प्रशासनाने बचावकार्य राबवून दोघांनाही सुखरुप बाहेर काढले.