मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- शहर हद्दीत नाकेबंदी करुन अवैध दारू वाहतूक करणारे आरोपी कार चालक व तसेच बार मालक कडून कार वाहनासह देशी, विदेशी दारुचा एकूण 4,61,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रमाणे आहे कि, दिनांक 07/02/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा अंतर्गत पथक पो स्टे वर्धा शहर परीसरात गुन्हेगार चेक व अवैद्य धंदयावर प्रो.रेड कामी रात्र पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून बोरगाव मेघे येथे राहणारा रजींत थुरवाल हा त्याचे ताब्यातील सिल्व्हर रंगाची होंडा सिटी गाडी क्रमांक MH 02 BM 2273 ने लिओ पोर्ट बार नागपुर येथून पवनार मार्गने त्याचे राहते घरी देशी विदेशी दारूसाठा घेवून येत आहे अश्या माहिती वरून त्यांचेवर नाकेबंदी करून प्रो रेड केला असता, आरोपी रणजित उपेंद्रसिंग थुरवाल, वय 23 वर्षे रा. बोरगाव मेघे याचे ताब्यातील होंडा सिटी कार क्र. MH 02 BM 2273 मधून पंचांसमक्ष 1) एका खर्ड्याच्या खोक्यात आफीसर चॉईस ब्लू कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल.च्या 36 सिलबंद शिश्या प्रती शिशी 350/- रु. प्रमाणे 12.600/- रु
2) एका खर्डाच्या खोक्यात ऑफिसर चॉईस कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 24 सिलबंद शीशा प्रती 300/- रु. प्रमाणे 7,200/- रु.
3) एका खर्ड्याचे खोक्यात 180 एम एल च्या रॉयल्स स्टॅग कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेल्या 48 सीलबंद शीशा प्रती 350/- रुपये प्रमाणे 16,800/- रू.
4) एका खर्ड्याच्या खोक्यात 90 एम.एलच्या टॅंगो पंच कंपनीच्या देशी दारुने भरलेल्या शील बंद 100 शिशा प्रती 1000/- रुपये प्रमाणे 10,000/- रू.
5) दोन खर्ड्याच्या खोक्यात 500 एम एल च्या टूबर्ग कंपनीच्या 48 बियर कॅन प्रती कॅन 300/- रू. प्रमाणे 14,400/- रू.
6) एक जुनी वापरती सिल्वर रंगाची होंडा सिटी चार चाकी कार क्रमांक एम एच 02 बी.एम 2273 अंदाजे किंमत 4,00,000/- रू. असा एकुण जु.कि 4,61,000/- चा मुद्देमाल जप्त करून आरोपी क्रमांक 01 याला जप्त दारुबाबत विचारणा केली असता त्याने स्वतः चे कारने जिल्हा नागपुर येथे जाऊन लिओ पोर्ट बार मालक चींतलवर यांच्याकडून देशी विदेशी दारू माल घेतला, अशी माहिती दिली. सदर दोन्ही आरोपीतां विरुध्द पो स्टे वर्धा शहर येथे अपराध क्र. 213/24 कलम 65 (अ)(ई)77(अ) 83, महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम 3(1)/ 181, 130/ 177 मोवाका अन्वये नोंद करून तपासावर आहे. सदर आरोपी क्र 01 यांस रितसर अटक करण्यात आलेली आहे.
सदरचा कारवाई सदरची कारवाई पोलीस अधीक्षक वर्धा नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. सागर कवडे वर्धा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड स्थानीक गुन्हे शाखा वर्धा यांचे निर्देषाप्रमाणे पोउपनि अमोल लगड, पोलीस अंमलदार सचीन ईंगोले, राजेश तिवस्कर, रामकिसन इप्पर, अरविंद इंगोले, सर्व स्थानीक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.