मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दि.26 जानेवारी 2024 ला महाराष्ट्र शासनाचे अधिसुचनेनुसार मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात सरसकट समावेश होण्याची शक्यता असल्यामुळे संपूर्ण ओबीसी समाज भीतीच्या दडपणाखाली आला आहे. सरसकट मराठा समाजाचा ओबीसीत समावेश झाल्यास ओबीसी आरक्षणात मोठया प्रमाणात वाटेकरी वाढणार आहे. त्यामुळे ओबीसींच्या तरूण पिढीचे भवितव्य अंधकारमय होण्याची दाट शक्यता आहे.
उपरोक्त संवेदनशील प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी संघर्ष समिती, हिंगणघाटचे वतीने येत्या 15 फेब्रुवारीला हरिओम सभागृह येथुन सकाळी 11 वाजता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे.
ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. सरसकट पद्धतीने मराठयांचा ओबीसीत समावेश केला जाऊ नये. दि.26 जानेवारीची अधिसुचना रद्द करण्यात यावी. इ. प्रमुख मागण्यासंदर्भात15 फेब्रुवारीचे मोर्चात ओबीसींनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन ओबीसी संघर्ष समिती हिंगणघाट तर्फे हरिओम सभागृहात आयोजीत पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.