मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांतच्या पुढाकाराने प्रांतातील प्रांत कार्यकारिणी आणि सर्व विभाग कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारणी, प्रखंड कार्यकारिणीचे अध्यक्ष, मंत्री, संयोजकव दयित्ववान कार्यकर्ते या प्रमाणे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील नुकतेच प्राण प्रतिष्ठा झालेल्या श्रीरामच्या दर्शनासाठी सुनिश्चित नियोजन करून यात्रा काढण्यात आली.
ही यात्रा नागपूर पासून अयोध्याधाम आस्था रेल्वेने करण्यात आली. या यात्रेत प्रांत कार्यकारिणी व सर्व विभाग, जिल्हा कार्यकारिणी प्रखंडचे दायित्ववान कार्यकर्ते सहभाग होऊन अयोध्याला ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ९.०० वाजता प्रस्थान झाले आणि १३ फेब्रुवारी ला सकाळी पोहचून शरयू नदीत गंगास्नान करणार हनुमान गढी, दशरथ महल, जनक महल, सीता रसोई दर्शन आणि १४ फेब्रुवारी ला सकाळी रामलला चे दर्शन होईल सायंकाळी परतीला निघणार असे नियोजन विहिप विदर्भ प्रांत ने आयोजित केले. या यात्रेत अहेरी जिल्हा सिरोंचा व अहेरी, एटापल्ली, मूलचेरा चे कार्यकर्ते प्रामुख्याने सहभाग झाले.