युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन कळमेश्वर:- येथील दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या धापेवाडा येथे ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महीला संस्था तसेच जनहित लोककला संस्था धापेवाडा यांच्या सयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक 11 फेब्रुवारीला झेंडे वाला बाबा देवस्थान शिवाजी चौक धापेवाडा येथे लोककलावंताचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमाचे उद्धघाटक डॉ राजीव पोतदार हे होते यावेळी रमेश मानकर, दयाल कांबळे, अरुण वाहाणे, संदीप उपाध्याय यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा संपन्न झाला.
या कार्यक्रमात 109 मंडळांनी सहभाग नोंदविला व आपापल्या विविध कला मंचावर सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ह्यावेळी कलाकार मंडळीना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच संस्थेच्या कार्यकारिणीत नवीन सभासदाची नियुक्ती करण्यात आली.
ह्यावेळी दिलिप धोटे, मनोहर काळे, सुधाकर खडसे आणि जनहित लोककला सेवा संस्था व ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महीला संस्था धापेवाडा राष्ट्रीय अध्यक्ष बाबराव दुपारे तसेच राष्ट्रीय सचिव निशाताई खडसे व महाराष्ट्र अध्यक्ष हरिराम गुरांदे व महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक लोणारे, विदर्भ अध्यक्ष सूनील डाहाट, नागपूर जिल्हा अध्यक्ष सुधाकर मुळेकर, पत्रकार संजय खांडेकर, पत्रकार युवराज मेश्राम, कॅमेरामॅन विनोद मोटघरे, ना.जी. उपाध्यक्ष ईश्वर मानकर, ना. जी संघटक दिलीप नवघरे, कळमेश्वर तालुका अध्यक्ष वासुदेव रेवतकर, उपाध्यक्ष शांताराम कडू, नरखेड ता. अध्यक्ष रामाजी धूर्वे, काटोल ता. अध्यक्ष विजय गजभिये, सावनेर ता. अध्यक्ष अमोल नेवारे, ना. जिल्हा अध्यक्ष ग्रामीण अध्यक्ष राजश्री काळबांडे, नागपूर जिल्हा संघटक, ना.जी.ग्रामीण तालुका अध्यक्ष कल्पना पाटणकर, ना. जी. उपाध्यक्ष सविता महल्ले, सावनेर तालुका अध्यक्ष पुष्पा उमक, नरखेड ता. अध्यक्ष अरूणा मुळेकर, काटोल ता. अध्यक्ष विमल ठाकरे, कळमेश्वर ता. अध्यक्ष प्रीती बिंड भिवापूर ता. अध्यक्ष आशा जगताप, योगराज दुपारे, प्रभाकर नागमोते , श्रावण शिरसागर, अरुण ढोले, संजय धुर्वे, मोरेश्वर मुळेकर, आकाश ठाकरे, विजय चौव्हान, अनिल बोरकर, आकाश काकडे, विजय डाहाट, विजय पाटील, देविदास हत्ती, शेषराव मानकर, पुरुषोत्तम मानकर, दत्तू मानकर, अर्चना मानकर, रेखा डाफे, सुनीता रानडे, निर्मला पाटील, निर्मला चोरे, भागेरथा ठूने, मारोती ठुने, माधुरी पाटील, मेघा उभाट, कल्पना चौधरी, भाग्यश्री गाडगे, पवन सावरकर, अक्षय हिवरकर, आणि सर्व कलाकार मंडळी उपस्थीत होते.

