मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
अहेरी:- तालुक्यातील दामरंचा गावापासून 10 कि.मी.अंतरावर वसलेल्या अतिदुर्गम आविकासीत चिटवेली गाव वसलेला असून सम्पूर्ण आदिवासी कुटुंब वास्तव्यास राहतात मात्र स्वांतत्र्यच्या होऊन इतकी वर्षा होत आहेत मात्र या गावाला जाण्यासाठी मुख्य मार्ग नसुन जंगलातुन पायवाटेने प्रवास करावा लागतो. नागरिकांना अनेक वर्षापासून त्रास सहन करवा लागत अनेकदां शासन प्रशासनाकडे मागणी करण्यात येत आहे मात्र याकडे दुर्लक्ष केला जात आहे.
काल चिटवेली येतिल झुरी दिलीप तलांडी वय 26 वर्ष हि गर्भवती होती तिला ट्रॅकटर मध्ये दामरंचा आणत असताना वाटेतच जिव सोडवी लागली असे कित्येक घटने झाली असतील हे मात्र निश्चितच आहे.
दरवेळी निवडणुक आले कि लोकप्रतिनिधी येवून मोठमोठे आश्वासन देत असतात मात्र सदर रस्त्याच्या समस्याचे निराकरण करण्यास दुर्लक्ष करत आहेत तरी प्रशासने लक्ष देवून रस्त्या करून देण्यात यावी अशी मागणी दामरंचा ग्राम पंचायतचे सरपंच सौ.किरण कोडापे,ग्राम पंचायत सदस्य श्री.सम्मा कुरसाम,प्रमोद कोडापे,यांनी केली आहे.

