✒️ पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे:- दिनांक १३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे तर्फे पोलीस अधिकारी / अंमलदार यांचे मानसिक व शारीरीक तंदुरुस्तीसाठी झुंबा प्रशिक्षणचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रसिद्ध झुंबा प्रशिक्षक श्रीमती पुनम जैन या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना झुंबा प्रशिक्षण देणार आहेत. दिनांक १३.०९.२०२२ रोजी सकाळी ०६.४५ वा. झुंबा प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलीस आयुक्त, प्रशासन पुणे शहर यांचे हस्ते व श्री विवेक पाटील, पोलीस उपआयुक्त, पोलीस मुख्यालय यांचे उपस्थित झाले, या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करते वेळी डॉ. जालिंदर सुपेकर म्हणाले की, पोलीसा मधील ताणतणाव कमी होवुन शारीरीक व मानसिक आरोग्य सदृढ होणेकरीता या चुंबा प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होईल.
या झुंबा प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी श्री दशरथ हटकर, राखीव पोलीस उपनिरीक्षक, श्री विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक, पोलीस कल्याण, श्री राऊत, पोलीस निरीक्षक बिनतारी संदेश विभाग, पुणे यांचे सह २०० पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला.

