अहेरी महिला पोलीस निरीक्षक काळबांधे यांना शेकडो महिलांच्या वतीने निवेदन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- येथील भूंजगंरावपेठा व वांगेपल्ली हद्दीत मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध विषारी दारूची विक्री होत असल्याने वादविवाद, भांडणतंटे वाढले असून महिलावर्गही मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे. अनेक तरुण या व्यसनाकडे वळल्याने अनेकांचे संसार उदध्वस्त तसेच उघड्यावर पडले आहे. यामुळे महिका दारू बंदी करण्याबाबत आक्रमक झाल्या आहे.
अहेरी पासूनच अवघ्या दोन तीन किलो मिटर अंतरावर असलेले भूंजगंरावपेठा व वांगेपल्ली येथील महिला पोलीस निरीक्षक काळबांधे यांना निवेदन मार्फेत अवगत करून देण्यात आले आहे. आज प्रत्येक तरूण व्यक्ती दारूचा व्यसनात मग्न झाले आहे. दररोज दिवसात चार पाच वेळा जावून वांगेपल्ली येथील दारू पित असतात विक्रेते हे आवक वाढत असल्यामूळे लवकर दारूचे उत्पादन वाढावी म्हणून गावठी दारू मध्ये पटकी, नवसागर, अमोनिया सह अनेक झाडांचे साली चे वापर करतात त्यामूळे मूबलक दारू जपाट्याने निघत असल्यामूळे पिण्याऱ्याचे आवक परत जावे नाही म्हणून असे गैरप्रकार करीत असताना दिसत आहेत. या विषेरी पदार्थामुळे दारू पिणाऱ्याचे आरोग्याला हानिकारक दुष्परिणाम होत आहे.
या विषारी दारू मुळे कित्येक गावातील तरूणांना जीव गमवावे लागले. कित्येक जन आजाराने ग्रस्त झालेले आहेत. त्यामूळे कित्येक महीलाना तारूण्यातच विधवा चे जिवन व्यतीत करावी लागत आहे. त्यामूळे गावातील महिला मंडळी एकत्रीत येवून अहेरी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार नोंदवून निवेदन देवून लवकरात लवकर कार्यवाही करण्यास विंनती करण्यात आले आहे. अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा यावेळी या महिलांनी दिला आहे.
यावेळी या महिलांचे निवेदन स्विकाराताना पोलीस निरिक्षक काळबांधे व पोलीस उपनिरीक्षक जावळे व तोरे मेजर व मडावी मेजर उपस्थित होते.

