प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागभीड:- दि. १९ फेब्रुवारी २०२४ ला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तालुका काँग्रेस कार्यालय नागभीड येथे तालुका काँग्रेस कमेटी व शहर काँग्रेस कमेटी नागभीडच्या वतीने साजरी करण्यात येत आली. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी, नागभीड शहर अध्यक्ष किशोर समर्थ, काँग्रेस जेष्ठ नेते अमीर धमानी, सेवादल काँग्रेस अध्यक्ष डॉ. रवींद्र कावळे, किसान सेल अध्यक्ष मधुकर बावणकर, माजी शहर अध्यक्ष विजय ठाकरे, बाजार समिती संचालक नरेंद्र हेमने, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष रवींद्र बळी, युवक शहर अध्यक्ष महेश कुरझेकर, माजी नगरसेवक प्रतिक भसीन, हरिश मुळे, रामदास हेमने, प्रशांत गेडाम, संतोष सोनुले, नंदुभाऊ खापर्डे, अरविंद खापर्डे, चेतन भोयर, नंदकिशोर गायकवाड, जावेद शेख, काँग्रेस पदाधिकारी शहर पदाधिकारी तालुका पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

