महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अलप्पुझा:- केरळमधून हत्येची अत्यंत हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. जिथे स्कूटर चालवत जात असलेल्या महिलेला सार्वजनिकरित्या पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले. महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला बेड्या ठोकल्या आहे. त्यानेच ही भयानक घटना केली आहे.
केरळमधील अलप्पुझा येथे ही हृदयद्रावक हत्येची घटना घडली. जिथे सोमवारी एका 32 वर्षीय महिलेवर तिच्या पतीने पेट्रोल टाकून पेटवून दिले. पट्टणक्कड येथील रहिवासी असलेल्या आरती चंद्रन तिचा नराधम पती श्याम चंद्रन ने भर रस्त्यात पेटवून दिले.
प्राप्त माहितीनुसार, सकाळी आरती तिच्या कार्यालयात जात असताना आरोपीने हा प्रकार केला. आरोपीने वाटेत त्यांची स्कूटर थांबवून त्यावर पेट्रोल शिंपडले. आरती ला काही समजण्याच्या आताच श्याम चंद्रनने तिला पेटवून दिले. आरती लगेचच आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली आणि मदतीसाठी ओरडत होती. ती वेदनेत होती. यावेळी आरोपी स्वतःही आगीत होरपळला.
आग विझवल्यानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. आरतीवर तिथल्या रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. यात विवाहितेचा पती आरोपी चंद्रन याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी स्थानिक सूत्रांनी घटनेचे कारण स्पष्ट केले आणि सांगितले की, आरती आणि श्यामचे नाते सध्या चांगले नव्हते. यामुळे आरतीने पती श्यामविरुद्ध घरगुती अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. यावर श्याम खूप नाराज झाला. त्यामुळेच त्याने हा गुन्हा केला.