निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपना:- तालुक्यातील नारंडा येथील वन तलावाचे खोलीकरण व दुरुस्ती करण्यात यावी अशी ग्रामपंचायत नारंडा तर्फे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी दालमिया सिमेंट कंपनीचे एचआर हेड अभिषेक कुमार मिश्रा यांच्याकडे केलेली आहे.
नारंडा येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सन २०१८-१९ मधे राज्याचे वन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वनतलवाची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हापासून सदर वन तलावाची दुरुस्ती व खोलीकरण झालेले नव्हते सदर तलावाचे खोलीकरण व दुरुस्ती झाल्यास भूजल पातळी वाढेल वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल व भूजल पातळी वाढल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता मदत होईल त्यामुळे ग्रामपंचायत नारंडा तर्फे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी दालमिया सिमेंट कंपनीचे एचआर हेड अभिषेक कुमार मिश्रा यांना निवेदन सादर केले व दालमिया सिमेंट कंपनीच्या सीएसआर निधी अंतर्गत खोलीकरण व दुरुस्ती करून देण्यात यावी अशी मागणी केली. यावर आपण उचित कारवाई करू असे आश्वासन कंपनीतर्फे देण्यात आले.