अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अत्यंत गरीब कुटुंबातील व गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी असलेल्या व सध्या आपल्या कृषी नगर अकोला येथे आपल्या नातेवाईकांनकडे आलेल्या लक्ष्मी सावंग या महिलेला ॲनेमीया, थायराइड, व ह्यदयाचा त्रास होता. या महीलेला सामाजीक कार्यकर्ता उमेश इंगळे व सुमीत तेलगोटे यांनी दि. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयात वार्ड नंबर ३० (महिला) भरती केले. सदर रुग्णाची या अगोदरच बायपास सर्जरी झाली आहे. रुग्णांला सर्वोपचार रुग्णालयातील वार्ड नंबर ३० (महिला) भरती करण्यात आले होते. योग्य उपचार करण्यात आले व सुट्टी (डिस्चार्ज) मिळाली. परंतु सदर रुग्णांकडे राशन कार्ड नसल्यामुळे त्यांना सर्वोपचार रुग्णालयात पैसे भरायचे सांगितले होते. अत्यंत गरीब असलेल्या या रुग्णांला व त्यांच्यासोबत त्याची आई होती. अशिक्षित असल्यामुळे या दोघींनाही काही समजत नव्हते. तेव्हा त्यांनी सुमित तेलगोटे यांच्या माध्यमातून परत एकदा उमेश इंगळे यांच्याशी संपर्क साधून सदर रुग्णांची अडचण सांगितली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी तात्काळ सर्वोउपचार रुग्णालयातील वार्ड नंबर 30 गाठून सदर रुग्णाची अडचण समजून घेतली. व त्या रुग्ण महिलेचे तपासणी रिपोर्ट घेऊन अपघात कक्षातील सिएमओ डॉ. विक्रांत इंगळे यांना सदर रुग्णांची परीस्थिती सांगितली व त्या महिला रुग्णांला राशन कार्ड नसल्यावरही मोफत उपचार उपलब्ध करून दिले व पुढील उपचारासाठी नागपूर येथील सुपर स्पेशालिटी मध्ये रेफर करण्यात आले. या रुग्णांला दि. २३ फेब्रुवारी रोजी डिस्चार्ज (सुट्टी) मिळाल्यावर रुग्ण व त्यांची आई दोंघीच्या डोळ्यात पाणी आले व पाणावल्या डोळ्याने उमेश इंगळे यांचे आभार मानले.
नेहमी कोणत्या कोणत्या कारणावरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नेहमीच चर्चेत असते परंतु आज शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील प्रमुख डॉ.आडे मॅडम, अपघात कक्षातील सिएमओ विक्रांत इंगळे, ब्रदर संकेत सदांशिव, नर्स प्रतिक्षा वरठे, सुरक्षा रक्षक पातोडे व वार्ड नंबर ३० (महिला) संबंधित डॉक्टर यांनी सदर रुग्णांवर उपचार करून योग्य मार्गदर्शन व सहकार्य करून माणुसकीचा परीचय दिला. त्याबद्दल सदर रुग्णांनी त्यांचे पण आभार मानले.