आशिष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे शासकीय प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्याकरिता सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असतो. सोबत जमीन संपादित करण्याची उपजिल्हाधिकारी यांच्याकडे जबाबदारी दिली जाते. मात्र वर्धेत तत्कालीन महिला भुसंपादन अधिकारीने तब्बल 2 कोटी 64 लाख रुपयाच्या शासकीय रकमेचा अपहार केल्याची खळबळजनक माहिती समोर आली.
वर्धेच्या उपजिल्हाधिकारी, लघु सिंचन कालवे प्रकल्पच्या भुसंपादन अधिकारी म्हणून स्वाती सूर्यवंशी या १७ फेब्रुवारी २०२२ ला रुजू झाल्या होत्या. वर्धा येथे या पदावर १२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत म्हणजे २ वर्ष २६ दिवस कार्यरत होत्या. दरम्यान सूर्यवंशी यांनी या पदावर असतांना शासकीय निधीचा अपहार केल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना मिळाली. यावरून जिल्हाधिकारी यांनी सर्वप्रथम या कार्यालयातील कागदपत्र सील करत समिती स्थापन करून चौकशीला सुरवात केली. चौकशीत समुद्रपूर तालुक्यातील २५ वर्ष पूर्वी वाटप केलेल्या १६ प्रकल्पग्रस्ताच्या नावाने २ कोटी १३ लाख
२८ हजार ३११ रुपये खोटे कागदपत्राच्या आधारे काढण्यात आले. तर कोषागार कार्यालयातील शासकीय खात्यातून पाच लोकांच्या नावे ५० लाख ८५ हजार ४२४ रुपये दोन पतसंस्थेत बनावटी खाते तयार करून वळत केल्याची बाब समोर आली.
सूर्यवंशी यांनी केलेल्या अपहार प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहे. २५ वर्षांपूर्वी निवड झालेल्या प्रकल्पच्या नावाने ज्या शेतकऱ्यांचे नाव निवड्यात नाही. मोबदला मिळण्याबाबत अर्ज सुद्धा सादर केला नाही; अश्या लोकांच्या नावाने पैसे काढण्यात आले. सोबतच या प्रकरणात वर्धेच्या शेतकरी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या, वर्धा व आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था, हिंगणघाट यांच्या सोबत सूर्यवंशी यांनी संगणमत करून बनावटी कागदपत्रांच्या आधारे खोटे खाते तयार करून पैसे काढल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ माजली असून महिला उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यावर या पूर्वी सुद्धा काही प्रकरणात कारवाई झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
यावरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले. प्रकरणी वर्धा शहर पोलिसात तत्कालीन उपजिल्हाधिकारी तथा भुसंपादन अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यावर विविध कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करणार व कोणाला कोणाला अटक करणार; हे आता येत्या काळातच कळेल. यातील मुख्य आरोपी स्वाती सूर्यवंशी या सध्या परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी सामान्य या पदावर कार्यरत आहे.
सूर्यवंशी भष्ट्राचार आणि विवादित कारकीर्द: 2004-2005 मध्ये कळमनुरी येथे तहसीलदार असताना तत्कालीन शिवसेना आमदार गजानन घुगे यांच्या तक्रारीवरून संजय गांधी निराधार योजना आर्थिक घोटाळ्यावरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. परभणीच्या सेलु येथे तहसीलदार असताना औरंगाबाद येथील विमान तळावर त्यांच्याकडे विना परवाना बंदुकीतील काडतुसे सापडली होती. त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिंतूरमध्ये तहसीलदार पदावर असताना एकाच दिवसात रोजगार हमी योजने अंतर्गत 100 कोटींच्या विहिरी आणि रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश दिले. परभणीत येथे आरडीसी असताना 2014 च्या हिवाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आले होते. जिंतुरच्याच प्रकरणात त्यांच्या मालमतेची चौकशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागा कडून करण्यात आली होती. हे प्रकरण संपुष्टात येईपर्यंत त्यांना महत्वाच्या कार्यकारी पदावर पदस्थापना देऊ नये असे आदेश असताना त्यांना परभणीत महत्वाचं पद देण्यात आलं.