हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा (पश्चिम विभाग) अंतर्गत तालुका शाखा राजुराच्या वतीने दि.16 फारवरी ते 25 फरवरी 2024 पर्यंत” डॉ. बाबासाहेब आंबेडकर सवजनिक वाचनालय रामपूर ता. राजुरा येथे धम्म उपासक आणि उपासिका प्रशिक्षण शिबीराचे आयोजन समता महिला मंडळ रामपूर तर्फे करण्यात आलेले होते. दि. 16 फरवारी ते 25 फरवारी 2024 रोज रविवार ला शिबीराचा समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला.
या शिबिरामध्ये सर्व प्रथम गौतम बुध्द आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून इजी.नेताजी भरणे जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्रिशरण पंचशील घेऊन पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला असंख्य उपासक, उपासिका यांनी सहभाग घेऊन धम्माचे प्रशिक्षण घेतले. तसे शिबीर मध्ये मेघा बोरकर, कमल टेकाडे, किशोर तेलतुंबडे, गायत्री रामटेके शहर अध्यक्षा सपना कुंभारे केंद्रीय शिक्षिका यांनी भेट दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरलीधर ताकसांडे समता बौध्द समाज मंडळ रामपूर या शिबिराचे अध्यक्ष धर्मुजी नगराळे भा.बौ.म राजुरा तालुका अध्यक्ष होते.
प्रमुख उपस्थितीमध्ये अशोक दुबे ग्राम अध्यक्ष, गौतम चौरे, भिमराव खोब्रागडे, गौतम देवगडे, सुजाता लाटकर जिल्हा उपाध्यक्ष, महिला विभाग केंद्रीय शिक्षिका, समता लभाने, पंचशीला वेल्हे, कविता अलोने, गायत्रीत रामटेके शहर अध्यक्षा आणि सुजाता नले केंद्रीय शिक्षिका हे होते या सर्वांनी शिबीरास मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनिया अबांदे संचालन अशोक मेश्राम यांनी केले. तर आभार प्रदर्शन रंजना ताकसांडे यांनी केले. तर प्रारंभी प्रशिक्षणार्थी बहुसंख्य महिलांनी आपले दहा दिवसामध्ये जे शिकायला मिळाले त्याबद्दल, संतोष कांबळे, सरला फुलझेले, उज्वला नले, वनिता मून, पौर्णिमा रामटेके, वंदना देवगडे, उर्मिला जनबंधू, विशेष गीता लोहे या ओबीसी महिलेने आपले सुंदर मनोगत व्यक्त केले. या शिबीरामध्ये दहा दिवसात सर्वच विषयांवर उषाताई आणि प्रगतीताई यांनी उत्तम तर्हेने शिकविल्या बद्दलची पावती दिली, त्याबद्दल सर्वांनी उषाताई आणि प्रगतीताई चे अभिनंदन केले.
विशेष म्हणजे प्रगतीताई ने डान्स, वेशभुषा आणि खेडी मेडीचे वातावरण तयार करून सगळ्याचे मनोरंजन केले. भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका च्या वतीने सर्वच प्रशिक्षणार्थी महिलांना उपासक, उपासिकाना प्रमाणपत्र देऊन गोैरविण्यात आले. आणि पदाधिकारी मुरलीधर ताकसांडे,किशोर तेलतुंबडे, धर्मुजी नगराळे, सुजाता लाटकर, प्रगती मेश्राम, उषा तामगडे, समता लभाने यांना सन्मान चिन्ह देण्यात आले. पदाधिकारी या शिबिराला दहा दिवस प्रशिक्षण देणाऱ्या उषाताई तामागडे आणि प्रगतीताई मेश्राम केंद्रीय शिक्षिका चंद्रपूर यांचे उपासक आणि उपासिकाणी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शेवटी सरणत्य घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.
शेवटी सर्वा करीता समता बौध्द मंडळ, समता महिला मंडळ रामपूर यांनी सुंदर जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती. रामपूर येथील सदर कार्यक्रम अविस्मरणीय झाला. या कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रसंगी पाहुण्यांचा झालेला आदर सत्काराचे स्वरूप पाहुन पाहुण्यांचे मन भारावून गेले. इतरांना बोध घेण्यासारखा प्रसंग होता. राजुरा तालुका शाखेचे अध्यक्ष धर्मुजी नगराळे सर्वच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या महिलांचे व पुरुषांचे चंद्रपूर जिल्हा, तालुका व शहर शाखेतर्फे हार्दिक अभिनंदन, धन्यवाद आणि सहर्ष आभार मानले. असेच भारतीय बौद्ध महासभा च्या कार्यास सहकार्य करावे आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब यांनी दिलेला विज्ञान वादी बौद्ध धम्म घरा घरात पोहचवावा हीच मंगलकामना करण्यात आली.