संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 26 फेब्रु:- समाजाला प्रबोधन करत नवा विचार देणाऱ्या “विजयाचा सातबारा” या ग्रंथाचे प्रकाशन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केले. टोंगे मित्रपरिवार चंद्रपूर तर्फे भवानजी भाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर येथे रविवारी हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ऍड. वामनराव लोहे, डॉ. इसादास भडके, डॉ. सुदर्शन दिवसे, श्री. विजय टोंगे, डॉ. अनिल शिंदे, श्री. सूर्यकांत खनके, श्री. लक्ष्मणराव धोबे, डॉ. सुरेश महाकुलकर, ॲड. पुरुषोत्तम सातपुते आदींची उपस्थिती होती.
यावेळी आमदार अडबाले म्हणाले की, श्री. विजय टोंगे यांचे शैक्षणिक क्षेत्रासोबतच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. वि.मा.शि. संघाच्या प्रगतीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. दीप प्रज्वलन आणि जिजाऊ वंदनेने सुरूवात झाली. प्रास्ताविक डॉ. दिवसे यांनी केलें. मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. दरम्यान चित्रकार सुदर्शन बारापात्रे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. भडके यांनी आपल्या मुख्य भाषणात ग्रंथांचा सविस्तर आढावा घेतला. हा प्रयोग अफलातून आणि अनुकरण करावा असा असून बहुजन समाजाने लिहिते व्हायला पाहिजे यासाठी आदर्श वास्तूपाठ आहे. गौरव ग्रंथांची नवी परंपरा घडणारा आहे. असे भडके म्हणाले. सत्काराला उत्तर देताना विजयराव टोंगे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि भविष्यात असेच सक्रिय राहणार असल्याचे सांगितले. प्रा. नामदेव मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, टोंगे मित्र परीवार आणि पत्रकार मंडळी उपस्थीत होती.