प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा :- जिल्हात दारू बंदी असताना ही चक्क महिला पोलीस आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत मद्यधुंद अवस्थेत कार चालवत अपघात केला होता. त्यामुळे ज्या पोलीस कर्मचाऱ्यावर दारू बंदीची अंमलबजावणी करण्याचे काम असताना त्यांची दारू पिऊन दारू बंदीला काळीमा फासला आहे. ही घटना २२ फेब्रुवारीला घडली होती.
महिला पोलिस अंमलदार आणि अंमलदार या दोघांनीही मद्यधुंद अवस्थेत चार चाकी वाहन चालवून दुचाकी चालकांना जबर धडक देत जखमी केले होते. यासंदर्भात सामाजिक माध्यमावर चलचित्र व्हायरल होताच पोलिस विभागाने चौकशी सुरू केली. या चौकशीमध्ये दोघेही दोषी आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. यासंदर्भात सोमवारी आदेश पारित करण्यात आला.
महिला पोलिस अंमलदार पूजा गिरडकर आणि अंमलदार मनोज सूर्यवंशी अशी निलंबित केलेल्या मद्यपी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे दोघेही कारमधून मद्यधुंद अवस्थेत प्रवास करीत असताना चालक पूजा गिरडकर यांनी भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून आर्वी नाका ते कारला चौकादरम्यान दुचाकीला जबर धडक देत दोन युवकांना जखमी केले होते.
तसेच उपस्थितांनी या घटनेचा मोबाइलमध्ये व्हिडीओ चित्रित करून सर्वत्र व्हायरल केला. तो दुसऱ्या दिवशी सर्वत्र पसरत सोशल मीडियावरून निलंबनाची मागणी करण्यात आली. या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध जखमी युवकांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपासला वेग देत अखेर या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्याना निलंबित करण्यात आले.

