अनिल अडकिने, नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 2 मार्च:- इंडियन मेडिकल असोसिएशन आयएमए सावनेर ची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून माजी राज्यसभा सदस्य व संचालक महात्मे आय बँक आणि रुग्णालय पद्मश्री डॉ.विकास महात्मे तसेच प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ फिजिशियन डॉ. विनोद बोकडे हे लाभले.
या कार्यक्रमात डॉ.विलास मानकर यांची निर्विरोध अध्यक्षपदी निवड झाली तसेच डॉ. स्मिता भुडे उपाध्यक्ष, डॉ. परेश झोपे उपाध्यक्ष, डॉ. अमित बाहेती सचिव, डॉ. प्रवीण चव्हाण कोषाध्यक्ष, डॉ. शिवम पुण्यानी सहसचिव आणि तसेच कार्यकारिणी सदस्य मध्ये डॉ. करुणा बोकडे, डॉ. शरद डोले, डॉ.निलेश कुंभारे, डॉ. आशिष चांडक व डॉ. उमेश जीवतोडे यांची निवड झाली. सह सदस्य पदासाठी डॉ.श्वेता चव्हाण व डॉ.अनुज जैन यांची निवड झाली.
या कार्यक्रमात सर्व आयएमए सदस्य उपस्थित होते. त्यानंतर वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम “जल्लोश 2024” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी भगत व डॉ. विशाल महंत यांनी केले. यावेळी आयएमए चे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.विलास मानकर यांनी संघटनेचा सहभाग सर्व सामाजिक कार्यात ठेवण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ. अमित बाहेती यानी सर्वांचे आभार मानले.