हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारानी प्रेरित होऊन बल्लारपूर मधील अनेक महिलां आणि व पुरुषांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जाहीर प्रवेश केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या शुभ हस्ते जिल्हा मनसे कार्यालय इथे महिलांनी जाऊन प्रवेश घेतला. विष्णूभाऊ बुजोने जिल्हा उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली मनसे बल्लारपूर शहर अध्यक्ष उमेश कुंडले यांचा नेतृत्वाखाली महिला प्रवेश घेण्यात आला.
यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष गोपाल मोहुर्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत अरुणा तोडसाम, स्मिता आत्राम, बबिता भगत, रजिता आवळे, शमा रणदिवे, शशिकला सोनावणे, रुंदा बोन्डे, रघुना आवळे, मनोज तोडसाम, विजेंद्र परमार, घनश्याम कुंडवे, योगराज चौधरी, चेतन मंगाम आणि मनसे सैनिक उपस्थित हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला.

