पालक सभेतील प्रमुख पाहूने म्हणून पेसा अध्यक्ष दिपक अर्का यांचे मार्गदर्शनातं पालकसभा संपन्न.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम जिल्हा परिषद केंद्र शाळेत दिनांक १ मार्च ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा राजाराम येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद परकीवार यांचे अध्यक्षतेखाली पालकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पेसा अध्यक्ष दिपक अर्का यांनी शैक्षणिक खर्चावर एकूण तीन लाख रुपये पेसा अंतर्गत देऊ असे पालक सभेत आस्वासन देण्यात आले आहे.
त्यानंतर पालक सभेतील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. १) शैक्षणिक सहलीसाठी तारीख ठरविणे आणि पालकवर्गाची अनुमती घेऊन विध्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाने. २) शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे. ३) शालेय भौतिक सुविधावर चर्चा करण्यात आले. ४) शाळेला आवश्यक असलेल्या साहित्य व क्रीडा साहित्य उपल्ब्ध करण्याविषयी. ५) शालेय परिसर सुशोभीकरणाविषयी. ६) अनुपस्थितीत विध्यार्थ्यांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी पालकांसोबत चर्चा. ७) इयत्ता तिसरीतून नवीन सदस्यांची निवड करणे आणि ग्रामपंचायत सदस्य व उच्च शिक्षित सदस्य निवड करणे. अश्याप्रकारे अनेक विषयांवर पालकांसोबत चर्चा करण्यात आली.
यावेळी या पालकसभेत शा.व्य.समितीचे अध्यक्ष अरविंद परकीवार, उपाध्यक्ष मनोज सिडाम, सदस्य जितेंद्र पंजलवार, जितेंद्र गड्डमवार, सदस्या सौ मीना सडमेक, सौ ममता सिडाम तसेच केंद्र शाळेतील केंद्र प्रमुख विनोद पुसलवार, मुख्याध्यापक अजय पस्पूनूरवार, पदवीधर शिक्षक सुरेशचंद्र जुमनाके, सुरेशचंद्र चुदरी, सहाय्यक जी. के. मडावी, शिक्षिका गीतांजली मोतकूरवार, शाळेतील शिक्षकवृंद आणि पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

